Summer Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Hacks: उन्हाळ्यातही भाज्या अन् फळं राहतील फ्रेश, असे करा स्टोअर

Summer Hacks: तुम्ही उन्हाळ्यातही तुमच्या भाज्या आणि फळं जास्तवेळ फ्रेश ठेवू शकता. यासाठी पुढील हॅक्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

how to keep fruits and vegetables fresh for long time in summer: उन्हाळा आला की भाज्या आणि फळं फ्रेश ठेवणे गरजेचे असते. अतिउष्णतेमुळे भाजीपाला आणि फळे लवकर खराब होतात, त्यामुळे जेवणाची चवच नाही तर पौष्टिकतेवरही परिणाम होतो. तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करून भाज्या आणि फळं फ्रेश ठेऊ शकता.

फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवा

फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्या आणि फळं पूर्णपणे स्वच्छ करा. काही फळे आणि भाज्या वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. कारण काही फळे वायू सोडतात ज्यामुळे इतर फळे आणि भाज्या लवकर खराब होतात.

योग्य तापमानात स्टोअर करावे

सर्व भाज्या आणि फळांसाठी समान तापमान ठेवणे योग्य नाही. काहींना थंड तर काहींना सामान्य तापमानात ठेवावे लागते. टोमॅटो आणि केळी फ्रिजमध्ये ठेऊ नका. कोथिंबीर, मेथी , काकडी स्वच्छ करून फ्रिजमध्ये ठेवावे.

पाण्यात ठेवू नका

फळे आणि भाज्या पाण्यात भिजवून ठेवू नका. कारण त्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. त्याऐवजी, त्यांना कोरडे आणि हवेशीर ठेवा.

कागदी टॉवेल वापरा

फ्रिजमध्ये भाज्या आणि फळं ठेवताना त्यांच्याभोवती पेपर टॉवेल ठेवा. हा पेपर टॉवेल जास्त ओलावा शोषून घेईल यामुळे भाज्या आणि फळं जास्त दिवस फ्रेश राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT