Shani dev  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Simple Ways of Get Blessing From Sani Dev: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे साधेसोपे उपाय

शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असून तुम्ही शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता.

Puja Bonkile

Simple Ways of Get Blessing From Sani Dev: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. हे उपाय केल्यास शनिच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते. हे उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊया.

  • शनि मंत्राचा जप करावा

शनिवारी शनि मंत्राचा जप करावा. नोकरी किंवा व्यवसायात सतत अपयश येत असल्यास शनिवारी या मंत्राचा जप केल्याने दोष दूर होतात.

  • शनि यंत्राची पूजा करावी

शनिवारी सकाळी आंघोळ करून शनियंत्राची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असल्यास तुम्ही शनिच्या शनियंत्राची पूजा करू शकता. यामुळे समस्या कमी होऊ शकतात.

  • दान करावे

शनिवारी दान करणे फायदेशीर मानले जाते. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. त्यामुळे शनि देव प्रसन्न होतात.

  • शनिदेवाला कसे प्रसन्न करावे

महादेवाची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. शनि देवाने आपल्या कठोर तपस्येने भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे जी व्यक्ती शनिवारी भगवान शिवाची आराधना करते त्यांच्यावर शनिमहाराजही प्रसन्न होतात.

शनि देवतेची पुजा करतांना महिलांनी घ्यावी काळजी

  • चांगले आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनिदेवाची (Shani Dev) नजर सदैव असते. कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनिदेवाची महादशा दूर होण्यासाठी महिला शनिदेवाची पूजा करू शकतात.

  • शनिदेवाची पूजा करताना महिलांनी शनिदेवाच्या मूर्तीला चुकूनही स्पर्श करू नये. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. शास्त्रानुसार शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने स्त्रियांवर शनिदेवाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.

  • शास्त्रानुसार महिलांना शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करणे देखील निषिद्ध आहे. शनीला प्रसन्न करण्यासाठी महिला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावू शकतात किंवा शनि मंदिरात शनीसाठी दिवा लावू शकतात.

  • शनिदेवाची आशीर्वाद मिळविण्यासाठी महिलांनी शनि मंदिरात शनि चालिसाचे पठण करावे. स्त्रियांसाठी ही सर्वात सोपी आणि सर्वोत्तम फलदायी पूजा मानली जाते.

  • शनिवारी महिलांना मोहरीचे तेल, काळे कपडे, काळे शूज, लोखंडी भांडी, काळे उडीद, काळे तीळ यासारख्या शनिशी संबंधित वस्तू दान करा. यामुळे शनिदोष शांत होतो. तसेच शनिदेव खूप प्रसन्न होतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Ganeshotsav: कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

"तो जर भेटायला पर्वरी ओलांडून आला, तर त्याच्याशी लग्नच कर"! 2100 साली कसा दिसणार पर्वरीचा रोड? पहा धमाल Photo

Viral Video: प्रेयसीनं दुसऱ्याशी लग्न केलं, ब्रेकअपमुळे तरुण रेल्वेखाली जीव द्यायला गेला, पण... थरार कॅमेऱ्यात कैद! पाहा व्हिडिओ

Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

T20 World Cup 2026: "निष्काळजीपणा महागात पडेल..." सनी पाजींकडून टीम इंडियाला धोक्याचा इशारा, फलंदाजांवर ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT