Heavy Periods Flow Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heavy Periods Flow : मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव ठरू शकतो गंभीर आजाराचे कारण; फॉलो करा या घरगुती गोष्टी

Heavy Periods Flow : अनेक मुलींना आणि महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो. या कालावधीला मेनोरेजिया ( (menorrhagia) असेही म्हणतात.

दैनिक गोमन्तक

Heavy Periods Flow : अनेक मुलींना आणि महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होतो. या कालावधीला मेनोरेजिया ( (menorrhagia) असेही म्हणतात. जर तुमची मासिक पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू असेल किंवा या काळात जास्त रक्ताच्या गुठळ्या पडत असतील, तर हे हेवी पीरियड्सची लक्षण आहेत.

सामान्य कालावधीच्या तुलनेत या काळात तुम्हाला जास्त थकवा आणि अस्वस्थता जाणवते. रक्ताच्या अति प्रवाहामुळे अनेक वेळा अॅनिमियाची लक्षणेही दिसू लागतात. त्यामुळे या स्थितीकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

हल्ली अनेक महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होण्याच्या तक्रारी पाहायला मिळतात. आरोग्याला हानी पोहोचवण्यासोबतच, ही समस्या नियमित दिनचर्येवरही वाईट परिणाम करू शकते. म्हणूनच तुमच्याकडे या समस्येशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे.

नैसर्गिकरित्या heavy रक्तस्त्राव कसे नियंत्रित करावे हे तज्ञांकडून जाणून घ्या

  • आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा

तज्ञांच्या मते तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, बीन्स, शेंगा, जर्दाळू, मसूर आणि मनुका यांचा समावेश करा. यासोबतच चहा-कॉफीचे अतिसेवन टाळावे.

  • इस्ट्रोजेनयुक्त आहार टाळा

इस्ट्रोजेनयुक्त आहारामध्ये पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न समाविष्ट आहे. यासोबतच नॉन ऑरगॅनिक आणि रेड मीट, विशेषतः सोया उत्पादने टाळा. त्याच वेळी, अल्कोहोल असलेल्या आणि प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या पदार्थांपासून अंतर ठेवा.

  • नियमित व्यायाम करा

शरीराचे वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी योग्य आहार घ्या आणि शारीरिक हालचालींमध्ये नियमितपणे सहभागी व्हा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT