Hanging Plants Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tips for Hanging Plants: हँगिंग रोपांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Hanging Plants Care Tips: जर तुम्ही तुमच्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी हँगिंग प्लांट्स लावले असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Hanging Plants Care Tips: सध्या घरांमध्ये हँगिंग प्लांट्स लावण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. काही काळापूर्वी लोक जागेच्या समस्येमुळे घरामध्ये हँगिंग प्लांटर्स वापरत असत, आता ती एक फॅशन झाली आहे.

बहुतेक लोक त्यांच्या बाल्कनीपासून त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत हँगिंग रोप लावतात. त्यात सुंदर अशी विविध प्रकारची झाडे लावतात. यामुळे घरात कमी जागेत जास्त रोप लावता येतात. एवढेच नाही तर लटकलेल्या रोपांमुळे त्यांचे घरही खूप सुंदर दिसते.

बहुतेक लोक त्यांच्या घरात हँगिंग प्लांट लावतात. परंतु त्यांची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे झाडे सुकतात. काही छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही या रोपांची काळजी घेऊ शकता.

  • दररोज पाणी द्यावे

जर तुमच्या घरात हँगिंग झाड असतील तर दररोज पाणी द्यावे. कारण हँगिंग प्लांट्समधील झाडे जमिनीतील झाडांपेक्षा जास्त लवकर सुकतात, कारण ते वाऱ्याच्या जास्त संपर्कात असतात.

म्हणून, आपण त्यांना नियमितपणे पाणी द्यावे. पण हँगिंग रोपांना जास्त पाणी देणे गरजेचे आहे. जास्त पाणी दिल्यामुळे तुमची रोप सडते आणि खराब होऊ शकते.

  • सुर्यप्रकाश

साधारणपणे लोक कुठेही हँगिंग प्लांट लटकवतात. असे करू नका. तुमचे रोप अशा ठिकाणी लटकवावे जेथे पुरेसा प्रकाश येईल.

काही झाडांना भरपूर प्रकाशाची गरज असते, तर काही कमी प्रकाशात वाढतात. 

  • खत घालावे

तुमच्या हँगिंग रोपांच्या चांगल्या वाढीसाठी, तुम्हाला वेळोवेळी पाण्यात विरघळणारे खत द्यावे लागेल.

म्हणून, तुमच्या इतर वनस्पतींप्रमाणे, तुम्ही तुमच्या हँगिंग रोपांना त्यांच्या गरजेनुसार खत घालावे. पण जास्त खत घालणे देखील टाळावे.

  • कटिंग करत राहावे

घरात असलेल्या हँगिंग रोपांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांचा आकार टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची वेळोवेळी कटिंग करावी.

यामुळे हँगिंग रोपांची योग्य वाढ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT