Valentine Special| Skin Care  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine Special: व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी

व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक मुली चेहऱ्यावर ब्लीच करून घेतात.

दैनिक गोमन्तक

Skin Care: व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यासाठी एकच दिवस राहिला आहे. अनेक मुली आपल्या त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात केली असेल. काही घरगुती पद्धतींचा अवलंब करतात, तर काही वेळे अभावी झटपट परिणाम देणारे प्रोडक्ट लावतात. झटपट परिणामांसाठी ब्लीच उत्तम आहे.

अनेक जण चेहऱ्यावर (Face) घरीच ब्लीच लावतात. काही लोक महिन्यातून एकदा किंवा दोनदाच वापरतात. ब्लीच केल्याने काही मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो येतो. पण ते योग्य पद्धतीने न केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. काही लोकांची त्वचा तर हे लावल्याबरोबर जळते. जर तुमच्या सोबतही असे घडत असेल तर तुम्हाला ते लावण्याची योग्य पद्धत माहित असणे गरजेचे आहे.

  • ब्लीच करण्यापूर्वी फॉलो करा स्किन केअर रुटिन

  1. ब्लीच करण्यापूर्वी चेहरा चांगला पाण्याने धुवावा.

  2. नंतर भरपुर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे.

  3. जेव्हा ब्लीच कराल तेव्हा आपला चेहरा थंड पाण्याने धुवा आणि टिश्यूने चेहऱ्यावर टॅप करा.

  4. आता ब्लीच लावा आणि नंतर काही वेळ राहू द्या. ब्लीच फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी लावाे. जर तुम्हाला थोडी जळजळ जाणवत असेल तर लगेच काढून टाका.

  5. वेळ संपल्यावर चेहरा लगेच स्वच्छ करा. ते काढून टाकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने पूर्णपणे धुवा आणि नंतर मॉइश्चरायझ करा.

  • ब्लीच लावतांना या चुका करू नका

  1. ब्लीचिंग केल्यानंतर उन्हात जाउ नका. तुम्ही उन्हात जात नसाल तरीही त्वचेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका.

  2. तुम्ही दुसऱ्या दिवशी सुट्टीवर जात असला तरी ब्लीच करू नका. हे एक रासायनिक उत्पादन आहे, ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकते.

  3. काही कार्यक्रम असल्यास एक दिवस आधी ब्लीच करू नका.

    ब्लीच हे एक उत्तम उत्पादन आहे. जे लावल्यानंतर चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येतो. पण त्यामुळे तुमचा रंग बदलेल असे नाही. हे करताना काळजी घेणे गरडेचे आहे. कारण ते सर्व प्रकारच्या त्वचेला सूट होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT