mosquitoes| Rain |health care tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care: डासांवर जबरदस्त घरगुती उपाय

Home Remedies: जाणून घेऊया डासांना स्वतःपासून कसे दूर ठेवायचे?

दैनिक गोमन्तक

पावसाळा (Monsoon) सुरू झाला आहे. या ऋतूत डास चावल्याने होणाऱ्या आजारांचा धोका जास्त असतो. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार प्रामुख्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पसरतात. घराभोवती पाणी साचल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊ लागते. या डासांमुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. डेंग्यू आणि मलेरियामुळेही अनेकांचा मृत्यू होतो. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी डासांना स्वतःपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही डासांना स्वतःपासून दूर ठेवू शकता.

डासांपासुन कसा करावा बचाव ?

कांदा वापरा

डासांना (Mosquito) तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीफंगल गुणधर्म असतात. त्याचा रस तुम्हाला संसर्गापासून वाचवू शकतो. जर तुम्हाला डासांना तुमच्यापासून दूर ठेवायचे असेल तर कांद्याचा रस अंगावर लावा. यामुळे डास तुमच्यापासून दूर राहतील.

लसूण गुणकारी आहे

लसणामध्ये अॅलिसिन नावाचा घटक असतो, जो डासांना तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. ते वापरण्यासाठी, 4 ते 5 लसणाच्या कळ्या घ्या. यानंतर एक चमचा खनिज तेल घ्या. आता त्यात लसूण ठेचून घ्या.

हे तेल रात्रभर राहू द्या. हे तेल सकाळी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. आता या तेलात लिंबाचा रस आणि दोन कप पाणी घालून चांगले मिक्स. आता एका स्प्रे बाटलीत ठेवा. यानंतर, झोपण्यापूर्वी किंवा बाहेर जाण्यापूर्वी आपल्या शरीरावर शिंपडा. डास चावणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

Goa Opinion: आमच्या टेकड्या सपाट होत आहेत, नद्या प्रदूषित होत आहेत, मासेमारीच्या जाळ्यातून सूटून 'गोवा' इंटरनेटच्या जालात अडकला आहे

Rohit Sharma Emotional: जल्लोष मैदानात, पण कॅमेऱ्यामनची नजर स्टँड्सवर! टीम इंडिया विश्वविजेता होताच 'मुंबईचा राजा' भावुक Video Viral

आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका! गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र एकमेकांचे भाव; कन्नड मेटी यांनी तुकारामांना जोडले हात

Goa Today's News Live: राती खंयतरी, ग्लास घेवन बसून तू उलयता; मेटी यांचा मनोज परब यांच्यावर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT