Egg  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Egg Effect: जास्त अंडी खाल्ल्याने 'हे' लोक पडू शकतात आजारी

Egg Effect: जाणून घ्या अंडी खाणे कोणासाठी हानिकारक

दैनिक गोमन्तक

अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी शरीराला आवश्यक असतात. पण तुम्हाला माहित आहे का? की, अंडी खाणे कोणासाठी हानिकारक आहे. (Egg Benefits)

अंडी खाल्ल्याने शरीर निरोगी आणि मजबूत होते. आरोग्य तज्ज्ञ नाष्ट्यामध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंडी खाल्ल्याने प्रोटीन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यांसारखे अनेक पोषक तत्व मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही एका दिवसात किती अंडी खावीत? जर नसेल तर आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांसाठी जास्त अंडी खाणे धोकादायक ठरू शकते.

किती अंडी खाऊ शकता?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांचे सेवन हे तुमच्या शारीरिक गरजा आणि हालचालींवर अवलंबून असते. पण, अंड्याच्या पिवळ्या भागात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असते, ज्यामुळे हृदयविकार वाढू शकतात. वॉशिंग्टनच्या सरकारी आरोग्य वेबसाइटनुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि हृदयरोग टाळण्यासाठी, तुम्हाला दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल मिळायला हवे. त्यामुळे हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी रोज एका अंड्याचे सेवन करावे.

अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

अंडी खाण्याचे फायदे

1) अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.

2) वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.

3) अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.

4) अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

Shani Gochar 2026: 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार 5 राशींचा सुवर्णकाळ! करिअर, व्यवसायात धनलाभाची संधी; मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT