Wheat Roti Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Roti Benefits: दिवसभरात प्रत्येकाने एकूण किती चपात्या खाव्यात? तज्ज्ञ सांगतात...

गव्हाची चपाती हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

Kavya Powar

गव्हाची चपाती हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. चपातीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय चपातीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात, जे आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका दिवसात आपण किती चपात्या खाव्यात? इथे जाणून घ्या.

बाजरी आणि मक्याच्या भाकऱ्याही फायदेशीर असल्या तरी, बहुतेक भारतीय घरांमध्ये गव्हाच्या चपात्याच खाण्याची प्रथा आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एका दिवसात किती चपात्या खाव्यत आणि महिनाभर चपाती सोडल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो. जाणून घेऊया…

गव्हाच्या चपाती किती खाव्यात

सामान्यतः चपातीमध्ये सुमारे 120 कॅलरीज असतात. अशा स्थितीत महिलांनी दोनच रोट्या आणि पुरुषांनी तीन सकाळी खाव्यात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुम्ही तुमच्या गरजेनुसार खाऊ शकता. तथापि, 3 किंवा 4 पेक्षा जास्त चपात्या पचण्यात मोठ्या समस्या असू शकतात.

1 महिना चपाती खाल्ली नाही तर?

तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही महिनाभर चपाती खाल्ली नाही तर शरीरात काय बदल होतील? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही चपाती खाणे पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. तथापि, आपण निश्चितपणे त्याचे सेवन थोडे कमी करू शकतो.

जे लोक वजन कमी करण्याच्या प्रवासात आहेत, त्यांनी याचे सेवन कमी करावे. गव्हाची चपाती खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि ग्लूटेनचे प्रमाण वाढल्याने चरबी जमा होण्यास सुरुवात होते.

याशिवाय जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. गव्हात कार्बोहायड्रेट आढळते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र चपाती शरीराला ऊर्जा देत असल्याने ती पूर्णपणे सोडून देण्याऐवजी कमी करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT