Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Recipe: घरीच बनवा भाज्यांपासून स्वादिष्ट व्हेजिटेबल चाप!

सोया आणि मलाई यासारखे चाप तुम्ही अनेक वेळा खाल्ले असेल पण तुम्ही कधी व्हिजिटेबल चापची चव चाखली आहे का? नसेल तर नक्की ट्राय करा.

दैनिक गोमन्तक

Vegetable Chaap Video Recipe: अनेक लोकांना हॉटेलमध्ये गेल्यावर चाप खायला आवडते. कधी मसालेदार तर कधी क्रिमी असे अनेक प्रकारचे चापची चव चाखायला मिळते. तुम्ही मलाई चाप, अफगाणी चाप, तंदूरी आणि आचारी चाप यांसारखे अनेक पदार्थ नक्कीच ट्राय केले असतील. पण, जर तुम्हाला चापची एकच एक चव चाखुन बोर झाले असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे.

  • व्हेजिटेबल चाप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटे उकडलेले - 6

बारीक चिरलेली कांदे- 2

बारीक चिरलेली शिमला मिरची 2

बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2

बारीक चिरलेली गाजर 2

बारिक चिरलेली कोथिंबीर -गरजेनुसार

कॉर्नफ्लोअर 1चमचा

चहा पावडर 1

कोरडी शेवया 1/2

जिरेपूड 1/2

तळण्यासाठी तेल- गरजेनुसार

चवीनुसार मीठ

आईस्क्रीम स्टिक

व्हेजिटेबल चाप बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले उकडलेले बटाटे चांगले मॅश करावे.

नंतर त्यात कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची, गाजर, कोथिंबीर, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, मिश्रित औषधी वनस्पती आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे

नमतर बटाट्याचे थोडेसे मिश्रण घेऊन आईस्क्रीम स्टिक चांगले लावा आणि त्याला चापचा आकार द्या.

नंतर थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून पेस्ट बनवा आणि त्यात व्हेजिटेबल चाप बुडवून शेवयांची कोट करा.

नंतर कढईत तेल गरम करून चाप तळून घ्या.

टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसह गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT