Goa News |Cold Drinks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Special Pineapple Drink: उन्हाळ्यात ट्राय करा अननस पन्ह्याची 'ही' खास रेसिपी

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे तर तुम्ही नेहमी पित असाल पण यावेळी ट्राय करा अननसच्या पन्ह्याची ही रेसिपी.

दैनिक गोमन्तक

Summer Special Drink: उन्हाळ्यात त्वचेसह आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. आंबट-गोड चव असलेले हे पन्हे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही आवडते. हे प्यायल्याने पोट आणि शरीर थंड राहते.

जर तुम्ही दरवेळी कैरीचे पन्हे बनवत असाल तर यावेळी काहीतरी नवे करून पहा आणि अननसाचे पन्हे बनवा. त्याची चव तुम्हालाही आवडेल.

लागणारे साहित्य

- चिरलेला अननस

- पाणी

- मीठ

- हळद

- काळी मिरी

- काळे मीठ

- साखर

- लाल तिखट

- भाजलेले जिरे पावडर

- पुदिना

- बर्फाचे तुकडे

- थंड पाणी

  • कृती

अननसाचे पन्हे बनवण्यासाठी अननस, पाणी, साखर, हळद, लाल तिखट, काळी मिरी, भाजलेले जिरे पावडर, काळे मीठ आणि मीठ एका खोलगट पातेल्यात एकत्र करा. आता ते उकळायला ठेवा आणि चांगले उकळू द्या.

कमीत कमी 15 मिनिटे किंवा अननस मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर ते गॅसवरून काढून बाजूला ठेवा आणि पूर्णपणे थंड करा. थंड केलेले पन्हे ब्लेंडरमध्ये टाकून त्याची प्युरी बनवा.

अननस पन्हे सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे आणि काही पुदिन्याची पाने घाला. नंतर 4-5 चमचे अननसाची जाड प्युरी घाला आणि त्यावर थंड पाणी घाला. आता ते चांगले मिक्स करा आणि नंतर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT