Use Mobile Cautiously Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Use Mobile Cautiously : मोबाईलचा अतिवापर केल्यास होऊ शकतो ‘या’ आजारांचा धोका!

दैनिक गोमन्तक

Use Mobile Phones Cautiously: आजप्रत्येक लोकांकडे मोबाइल आहे. आपला जास्तीत जास्त वेळ मोबाइलमध्ये जातो. लोक त्यांच्या मोबाइलवर तासन्तास सोशल मीडियाचा वापर करतात. अन्न, कपडे आणि घर यांच्याप्रमाणेच मोबाईल देखील जनतेसाठी महत्त्वाचा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्य़ंत मोबाईल सतत आपल्यासोबत असतो. पण मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

मोबाईलचा वापर किती करावा हे आपल्यावर अवलंबून असते. आपण कशासाठी आणि का वापर करतो यावर त्याचे महत्व अवलंबून असते. खरं तर मोबाईल उपकरणांमधून धोकादायक रेडिएशन बाहेर पडतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असतात.

एका अहवालानुसार 0.60 वॅट्स/किलोग्रामपेक्षा जास्त रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक आहे, परंतु मोबाईमधून बाहेर पडणारे रेडिएशन दुप्पट आहे.

किरणोत्सर्गाचा प्रभाव इतका भयंकर आहे की कर्करोगासारखे आजार लोकांमध्ये वाढत आहेत, याशिवाय गर्भधारणाही कमी होत आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालानुसार मोबाइलचा अतिवापर केल्याने मेंदूच्या पेशी कमजोर होतात.

  • मोबाइलाचा अतिवापरामुळे ‘या’ आजारांचा धोका

निद्रानाश
जर तुम्ही मोबाईलवर बराच वेळ बोलत असाल तर तुम्हाला निद्रानाशाची समस्या होऊ शकते.  मोबाईलवर जास्त वेळ बोलल्याने मेंदूमध्ये बनलेले काही रसायने निष्क्रिय होतात, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो.

कॅन्सर

जे लोक मोबाईल फोनवर जास्त वेळ बोलतात त्यांना मेंदूच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. मोबाईल कानाजवळ ठेवून बोलत असताना त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन टिश्यूज शोषून घेतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

बहिरेपणा
मोबाईलवर जास्त वेळ बोलल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे तुम्हाला बहिरेपण येउ शकते. खरं तर मोबाईलमधून  बाहेर पडणाऱ्या लहरी कानाच्या नाजूक ऊतकांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे कानाच्या आतील भागावर सर्वाधिक परिणाम होतो.

एकाग्रता कमी होते
मोबाईल फोनवर जास्त वेळ बोलल्यानेही लोकांच्या मल्टीटास्किंग कौशल्यावर वाईट परिणाम होतो आणि एकाग्रता कमी होऊ लागते. जे लोक मोबाईलवर बराच वेळ बोलतात ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांची कार्यक्षमता बिघडते.

मोबाईल रेडिएशन कसे टाळावे?

जर तुम्ही फोन जास्त वापरत असाल तर कमीत कमी वापरा. याशिवाय फोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन टाळण्यासाठी हेडफोनचा वापर करावा. याशिवाय फोन खरेदी करताना त्याची SAR व्हॅल्यू तपासून घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT