Hair Loss Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care Tips: कंडिशनर चुकीच्या पद्धतीने लावल्यास गळू शकतात केस

Hair Conditioner: कंडिशनर योग्य पद्धतीने वापरले नाही तर केस गळू शकतात.

दैनिक गोमन्तक

केसांमध्ये डीप कंडिशनिंग करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी बहुतांश मुली पार्लरमध्ये जातात. ऊन, धूळ, प्रदूषण आणि घाम यामुळे तुमच्या केसांना दररोज कितीतरी समस्यांना तोंड द्यावे लागते. (How to Use Conditioner)

यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा नष्ट होतो. त्यामुळे केस (Hair) कमकुवत आणि पातळ होतात. मग कंडिशनर नीट केले नाही तर केस गळण्याची समस्या सुरू होते. कंडिशनर कसे वापरायचे ते जाणून घ्या.

  • प्रथम शॅम्पू करा

डीप कंडिशनरचे एकच ध्येय असते. कोरडे किंवा खराब झालेले केस दुरुस्त करणे. म्हणून डीप कंडिशनर्सचे अनेक प्रकार नाहीत, फक्त वेगवेगळे ब्रँड आहेत. तुमच्या केसांच्या आणि बजेटच्या गरजा पूर्ण करणारे डीप कंडिशनर शोधा. प्रथम केस नीट धुवावे.

  • केस ओले करा

तुमचे केस कोमट किंवा थंड पाण्याने धुवावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे केस आधी शॅम्पू करू शकता. पण तुम्हाला फक्त तुमचे केस ओले करायचे आहेत. तुमचे केस नीट ओले झाल्यानंतर केसातील (Hair) जास्ती पाणी पिळून घ्या.

  • डीप कंडिशनर लावा

आपल्या हातांनी कंटेनरमधून थोडेसे कंडिशनर काढा आणि संपूर्ण डोक्यावर जाड थर लावा. बहुतेक कंडिशनर तुमच्या केसांच्या टोकांना लावा. पण तुम्ही हे केसांच्या मुळांपर्यंत आरामात लावू शकता.

केसांच्या छोट्या लट घेऊन सर्व केसांना नीट कंडिशनर लावा. केसांचे कोणतेही भाग सुटणार नाही याची काळजी घ्या. जेणेकून प्रत्येक स्ट्रँडला पूर्ण कोटिंग मिळेल.

  • धुवा

डीप कंडिशनर पूर्णपणे काढण्यासाठी साधारण 3 ते 5 मिनिटे धुवा. तुमच्या केसांमध्ये कोणतेही अतिरिक्त अवशेष राहू नयेत याची काळजी घ्या. हे जर नीट निघाले नाही तर तुमचे केस चिकट होऊ शकतात.

  • सूचनांचे पालन करा

कंडिशनर लावण्यापूर्वी कंडिशनरचे पॅकेजिंग वाचा. तसे 20 ते 30 मिनिटांसाठी अप्लाय करण्यास सांगितले जाते. पण तुमच्या पॅकेजवरील सूचना वाचा. आणि त्यानुसार पालन करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT