Honeymoon Destinations Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Honeymoon Destinations: लवकरच वाजणार लग्नाची सनई? मग हनिमूनसाठी आताच पाहून घ्या 'हे' 5 सर्वोत्तम डेस्टिनेशन्स ऑप्शन्स

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हनिमूनसाठी नवे जोडपे विदेशात जाणे पसंत करतात.

Puja Bonkile

Honeymoon Destinations: जर तुमचे जस्ट लग्नबंधनात अडकले असाल आणि आता डिसेंबरमध्ये हनिमूनसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर जगभरात अनेक रोमँटिक डेस्टिनेशन आहेत.

लग्नानंतरचा हा क्षण तुमच्यासाठी खूप खास असल्याने योग्य हनिमून डेस्टिनेशन निवडणे गरजेचे आहे. भारताबाहेरील अशाच 5 रोमँटिक हनिमून डेस्टिनेशनबद्दल जाणून घेणार आहोत.

मालदीव

मालदीव कपल्सचे आवडते ठिकाण असून हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथील निळे पाणी जगभर प्रसिद्ध आहे. येथील वॉटर व्हिला आणि रिसॉर्ट्स आयुष्यातील हा खास क्षण आणखी खास बनवतात.

बाली

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले बालीचे दृश्य खूप खास आहे. जगभरातील कपल्स येथे रोमान्सचा आनंद घेण्यासाठी येतात. इंडोनेशियातील सर्वात सुंदर बेटांमध्ये बाली शीर्षस्थानी आहे. येथे येऊन तुम्ही उलुवातु मंदिर-माउंट बतुर, नुसा पेनिडा, हंडारा गेट आणि बाली स्विंगचा आनंद घेऊ शकता. 

मेक्सिको

जर तुम्हाला हनीमूनसाठी भारताबाहेर जायचे असेल आणि रोमान्सची मजा घ्यायची असेल, तर मेक्सिको परफेक्ट ठिकाण आहे. मेक्सिकोमधील बीच-अ‍ॅडव्हेंचर आणि पार्टी लाइफ यासारख्या गोष्टी तुमचा प्रत्येक दिवस खास बनवतील. येथे येऊन तुम्ही कोझुमेल, प्वेर्तो वल्लार्टा, एन्सेनाडा, काबो सॅन लुकास, माझाटलान सारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

जपान

जपानमध्ये हनिमून साजरा करणे देखील खूप खास आहे. सुंदर चेरी ब्लॉसम फुलांची पार्श्वभूमी आणि जवळपासचे तुमचे प्रेम क्षणाला रोमान्सने भरून टाकेल. येथे येऊन तुम्ही शांततेसोबतच रोमान्सचाही आनंद घेऊ शकाल.

ग्रीस

कपल्ससाटी सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन्समध्ये ग्रीसचेही नाव घेतले जाते. येथील बेटे अतिशय सुंदर आहेत. ग्रीस नैसर्गिकरित्या खूप सुंदर आहे आणि कपल्ससाठी प्रणय करण्यासाठी सर्वात योग्य ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या पार्टी लाइफचा आनंद लुटणं स्वतःच खास आहे. जर तुम्हाला हनिमूनचे छान व्हाइब्स हवे असतील तर तुम्ही ग्रीसला या आणि तुमच्या जोडीदारासोबत अथेन्सला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT