Homes of Goa in Portuguese East Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गोव्यातील रंगीत घरांची गोष्ट

पोर्तुगीज (Portuguese) पूर्वकाळात गोव्याची (Goa) घरे कोकणातल्या घरासारखी अंगणात आतल्या बाजूने दरवाजा असलेली आणि लहान खिडक्या असलेली होती.

दैनिक गोमन्तक

पोर्तुगीज (Portuguese) पूर्वकाळात गोव्याची (Goa) घरे कोकणातल्या घरासारखी अंगणात आतल्या बाजूने दरवाजा असलेली आणि लहान खिडक्या असलेली होती. दिवसभर शेतात किंवा उघड्यावर राबून नको झाल्यावर लहान खिडक्या असलेल्या घरात डोळ्यांना निवांतपणा यायचा. पोर्तुगीज काळात ख्रिश्चन समुदाय युरोप आणि इतरत्र निर्भिडपणे पोहोचला. जेव्हा हे लोक जग फिरून पुन्हा गोव्यात आले तेव्हा त्यांनी ह्या दुसऱ्या जगातल्या कल्पना आपल्याबरोबर आणल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या रचना सौंदर्यपूर्णरीत्या स्वीकारल्या. पण ह्या मंडळींनी आपली मुळे पूर्णतया सोडून दिली नाहीत. तो एक सांस्कृतिक मिलाप होता. त्याचा परिणाम घरांच्या रचनेवरही झाला. घरातल्या अंगणात आतल्या बाजूने उघडणारे दरवाजे हळूहळू रस्त्याच्या दिशेने उघडू लागले. घरांना बाल्कनी आल्या.

या बाल्कनीत आता माणसे बसलेली रस्त्यावरच्या लोकांना दिसू लागली. स्वयंपाक घरातच अडकलेल्या स्त्रीला (आपल्या पुरुषांबरोबरच का होईना) आपल्या घरातच मोकळा अवकाश मिळाला. ही जागा आता विशेष सजवली जाऊ लागली. भरदार खांब आले. घराच्या पायऱ्या घराच्या मालकाचे सामाजिक स्थान सांगू लागल्या. रुबाबदार पायऱ्या आणि त्यांची संख्या हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जाऊ लागलं.

Homes of Goa in Portuguese East

पोर्तुगालमध्ये असलेल्या खिडक्यासारख्या या घराच्या खिडक्याही हळूहळू या घरात चपखल येऊन बसल्या. पूर्वी सर्वसमान दिसणाऱ्या घरांना आता वेगवेगळी ओळख मिळू लागली. घराचे खांब, खिडक्या, व्हरांडे अधिकाधिक सुशोभित होऊ लागले. खिडक्यांच्या वर बसवलेला छपरी आडोसा ही गोव्याच्या घरांचे वैशिष्ट्य आहे. मंगलोरी नळ्यांच्या वापराने खिडक्याना आणि पर्यायाने घराना देखणेपण आले.

Homes of Goa in Portuguese East

नाट्यपूर्ण आणि गडद रंग हे गोव्याच्या ख्रिश्चन घरांचे आणखीन एक प्रभावी वैशिष्ट्य ठरले. अगदी सुरुवातीच्या काळात नैसर्गिक डाय वापरून मिळवलेल्या रंगानी या घरांना रोमांचकता दिली. पोर्तुगीज काळात रंगांच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर अर्थातच मर्यादा होती, पण घर रंगवल्याविण राहिले तर दंड होऊ शकत होता. अशी फारच कमी घरे होती जी एकाच रंगाने हुबेहूबपणे रंगवली जात असत.

Homes of Goa in Portuguese East

पोर्तुगीज काळात पांढऱ्या रंगाने घरे रंगवायची नाही हा अलिखित नियम होता कारण फक्त चर्च आणि चॅपल आणि पांढऱ्या रंगाने रंगवले जात असे. गोव्यातल्या ख्रिश्चन समुदायाने हे नियम मानून घेतले होते. हिंदू समाजानेसुद्धा घराच्या रंगांचे हे देखणेपण आणि वेगळेपण स्वीकारायला सुरुवात केली आणि एका आगळ्या शेजार-स्पर्धेतून गोव्यातील घरे वेगळ्या प्रकारे रंगीत होत गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

SCROLL FOR NEXT