Homemade Cake  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Homemade Cake: घरी केक बनवताना 'ही' काळजी नक्की घ्या

Homemade Cake: यामुळे केक खराब होऊ शकतो आणि तो जळू शकतो.

दैनिक गोमन्तक

Homemade Cake: आपण अनेकदा घरात बेकरीतले पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. केक हा बहुतेकजणांना आवडणार आणि खास क्षणी खाण्यात येणारा पदार्थ आहे. असा हा केक आपण घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अनेकदा किंचित चूकीमुळे आपला केक व्यवस्थित होत नाही. त्यामुळे घरी केक बनवताना थोडी काळजी घेणे महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊयात घरी केक बनवताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे.

योग्य कुकर वापरा
केक बनवण्यासाठी नेहमी जड तळ आणि घट्ट झाकण असलेला कुकर वापरा. तसेच झाकणाचे रबर काढून झाकण लावावे. याशिवाय केक बनवण्यापूर्वी कुकर ५ मिनिटे व्यवस्थित गरम करा.

स्टँड वापरा
केकचे पिठ असलेले भांडे थेट कुकरमध्ये कधीही ठेवू नका. यामुळे केक खराब होऊ शकतो आणि तो जळू शकतो. म्हणून, नेहमी कुकरमध्ये प्रथम स्टीलचे स्टँड ठेवा आणि नंतर त्यावर पिठ असलेले भांडे ठेवा. असे केल्याने केक चांगला बेक होतो.

केकच्या पिठात व्हिनेगर मिसळा
जर तुम्हाला बेकरीप्रमाणे मऊ आणि स्पॉन्जी केक घरी बनवायचा असेल, तर पिठात अर्ध्या चमच्यापेक्षा थोडे कमी व्हिनेगर घाला. त्यामुळे तुमचा केक बेकरीप्रमाणे होऊ शकतो.

केक चांगला बेक होण्यासाठी योग्य तापमान
जर तुम्ही कुकरमध्ये केक बनवत असाल, तर गॅस पूर्ण वेळ मध्यम ठेवा. ओव्हनपेक्षा गॅसवर केक बनवायला जास्त वेळ लागतो हे लक्षात ठेवा, त्यामुळे अजिबात घाई करू नका. टूथपिकने एक किंवा दोनदा तुम्ही केक बेक झाला आहे की नाही याचा अंदाज लावू शकता. पण जास्त वेळा कुकर उघडणे टाळा.

या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला तुमचा केक उत्तम बनवल्याचा आनंद घेता येईल. त्यानंतर तुम्ही या केकवर क्रीमदेखील लावू शकता आणि घरी बनवलेल्या केकचा आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

Mangal Gochar 2026: लव्ह लाईफ होणार अधिक रोमँटिक, कुटुंबात राहणार आनंदाचे वातावरण; मंगळ देव 4 राशींना करणार मालामाल

SCROLL FOR NEXT