Somavar Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Somavar: सोमवारी भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास मिळेल आशीर्वाद

भगवान शंकराचा खास आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारी सिद्ध योग तयार होत आहे. यामध्ये देवाची पूजा करून काही उपाय केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

Puja Bonkile

home yog remedies lord shiva puja benefits prosperity good health

सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. आज देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी अधिक शुभ आहे. कारण 12 फेब्रुवारीला सिद्ध योगाची निर्मिती झाली आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवारी सिद्धयोगात भोलेनाथाची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो. या काळात भगवंताचे नामस्मरण करणे हेही मोठे पुण्य मानले जाते.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात अडचणी, आर्थिक संकट किंवा कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत असेल तर सोमवारी तुम्ही काही उपाय करू शकता. भगवान शिवाचे हे उपाय केल्याने माणसाला भोलेनाथाची कृपा प्राप्त होते. जीवनात सुख-समृद्धी येते.

  • शत्रूमुळे त्रासलेले

जर तुम्हाला तुमच्या शत्रूंपैकी कोणी त्रास दिला असेल. यापासून सुटका हवी असेल तर सोमवारी सकाळी आंघोळ करून भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान शिवाच्या ओम नम: शिवाम मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. लवकरच तुम्ही तुमच्या शत्रूपासून मुक्त व्हाल.

जर तुम्ही सोमवारी मुलाखत देणार असाल तर महादेवाची पूजा करावी. या दिवशी घरातून बाहेर पडताना आरशात आपला चेहरा नक्की पहावा. असे केल्याने मनात सकारात्मकता येते. मन आतून प्रसन्न राहते आणि यशही मिळते.

  • व्यवसायात यश

जर तुम्हाला बिझनेसमध्ये नुकसान होत असेल आणि आर्थिक चणचण भासत असेल किंवा तुम्ही काही नवीन काम सुरू करणार असाल तर भोलेनाथाची पूजा करावी. सोमवारी आंघोळ करून शिवलिंगाला जल अर्पण करावे. दुधाचा अभिषेक केल्यानंतर धतुरा अर्पण करावा. याशिवाय 2 पांढरी फुले घ्या आणि खिशात ठेवा, व्यवसायात वाढ झाल्याचे दिसले की वाहत्या पाण्यात तरंगवा. दर सोमवारी हा उपाय केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल.

  • मुलाखत

जर तुम्ही सोमवारी मुलाखत देणार असाल तर महादेवाची पूजा करावी. या दिवशी घरातून बाहेर पडताना आरशात आपला चेहरा नक्की पहावा. असे केल्याने मनात सकारात्मकता येते. मन आतून प्रसन्न राहते आणि यशही मिळते.

  • यश मिळवण्यासाठी

जीवनात कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मन आतून अस्वस्थ होते. तुमच्याकडे काही नाही असे वाटत असेल तर सोमवारी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ जपावी. सोमवारी हा उपाय केल्यास यशाच्या मार्गात येणारे अडथळे आपोआपच दूर होतील.

  • शत्रूमुळे त्रासलेले

जर तुम्हाला तुमच्या शत्रूंपैकी कोणी त्रास दिला असेल. यापासून सुटका हवी असेल तर सोमवारी सकाळी आंघोळ करून भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा. भगवान शिवाच्या ओम नम: शिवाम मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. लवकरच तुम्ही तुमच्या शत्रूपासून मुक्त व्हाल.

  • संघर्ष दूर होईल

कुटूंबातील सदस्यांमध्ये काही ना काही कारणावरून परस्पर नाराजी किंवा मतभेद असल्यास सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जावे. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला एक वाटी तांदूळ दान करावे. दर सोमवारी हा उपाय केल्याने मन शांत राहील. घरातील वातावरणही सकारात्मक राहील.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT