Home Remedies: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies: कफचा होतोय त्रास, स्वयंपाकघरातच आहे उपाय: 'हे' पदार्थ आहेत गुणकारी!

हवामानात बदल झाल्यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते. पण तुम्ही घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकता.

Puja Bonkile

Home Remedies: अनेक लोकांना वातावरणात बदल झाला की लगेच कफ होतो. अशावेळी लगेच कफ सिरफ घेतात. पण तुम्ही कफ सिरफ न घेता घरगुती उपायांनी कफची समस्या कमी करू शकता. हिवाळ्यात पुढील पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला सर्दी किंवा खोकला होणार नाही.

हे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळतील. यामुळे छातीत दुखणे. गळ्यात खवखव होणे यासारख्या समस्या कमी होतात. हे पदार्थ लहान मुलांनासाठीही फायदेशीर असते.

जीरं पाणी

खोकला आणि सर्दी झाल्यास एक चमचा जिरे घेऊन ते एका ग्लास पाण्यात उकळून घ्यावे. पाणी अर्धे झाले की ते काढून कोमट प्यावे. यामुळे खोकला, खवखवणे, सर्दी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

ओवा

ओवा हंगामी रोगांपासून शरीराचे संरक्षण करते. यात खोकला मुळापासून नष्ट करण्याची ताकद आहे. ओव्याचे पाणी उकळून प्यायल्याने नाक बंद होणे, छातीत जड होणे आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

मेथी पाणी

एक चमचा मेथी घ्या आणि एक कप पाण्यात उकळा. 5 मिनिटांनंतर हे मिश्रण काढून गाळून घ्या आणि सेवन करावे. कफ, खोकला आणि घसादुखीसाठी हा एक उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.

आलं

हिवाळ्यात आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार त्यात खोकला आणि कफ दूर करणारे गुणधर्म आहेत . एक छोटा आल्याचा तुकडा घेऊन एक कप पाण्यात 5 मिनिटे उकळा आणि नंतर हा चहा गाळून प्यावा.

आवळा रस

कफ कमी करण्यासाठी आवळा किंवा त्याचा रस पिऊ शकता.हा रस एक चमचा दिवसातून दोन वेळा घेतल्यास खोकला, खवखव यापासून आराम मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT