Home Remedies For Piles Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Piles वर 7 उत्तम घरगुती उपाय

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) ही एक सामान्य समस्या असून यावर अनेक घरगुती उपाय आहेत.

दैनिक गोमन्तक

मूळव्याध (Piles) ही एक सामान्य समस्या आहे. अनेक लोक या समस्येचा सामना करत आहेत. पण, ही समस्या खूप त्रासदायक असते. मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत, एका प्रकारात मूळव्याधातून रक्त येते आणि दुसऱ्यात गुदद्वाराभोवती खाज, जळजळ आणि वेदना होतात. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर सूज येते. यामुळे त्या व्यक्तीला उठता-बसताही प्रचंड वेदना होतात. या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास तो आणखीनच वेदनादायक ठरतो. (Home Remedies For Piles News)

अनेकदा लोक मूळव्याध समूळ नष्ट व्हावी म्हणून ऑपरेशनचा मार्ग स्वीकारतात. काहींना या ऑपरेशननंतर देखील फरक पडत नाही. तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून पाहू शकता.

* घरगुती उपाय

* कोरफडीचे जेल मूळव्याधावर लावल्याने वेदना आणि खाज दोन्ही कमी होतात.

* मूळव्याधच्या सूजलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल लावल्याने सूज काही प्रमाणात कमी होऊ शकते.

* जिऱ्याची बारीक पावडर तयार करून मुळव्याधाच्या भागावर लावा. यामुळे वेदनेपासून आराम मिळेल.

* लिंबाच्या रसामध्ये आले आणि मध मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पाइल्सची (Piles) समस्या कमी होऊ शकते.

* मूळव्याधाच्या जागेवर खोबरेल तेल लावल्याने खाज आणि जळजळ कमी होते.

* एक ग्लास ताकात पाव चमचा ओवा पावडर मिक्स करून जेवणानंतर प्या.

* बर्फाचे काही तुकडे कापडात गुंडाळून रोज 10 मिनिटे मूळव्याधाच्या ठिकाणी लावा. याने काही दिवसांमध्ये वेदना कमी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अशा खट्टरांची पूजा खेटरांनीच करा- संपादकीय

खरी कुजबुज: बाबू आता काय करतील?

403 पदांसाठी 10 मे रोजी परीक्षा होणार, कर्मचारी भरती आयोगाकडून माहिती जारी; परीक्षा केंद्रात बदल नाही

प्रदूषण मंडळ, आरोग्य खाते करणार तलावाची पाहणी; पांगम यांची माहिती, मंगळवारी होणार सुनावणी

Lairai Jatra: शिरगावात 'देवी'चा जयघोष, भक्तांना आस दर्शनाची; जत्रा निर्विघ्नपणे साजरी होण्यासाठी 'लईराई'ला साकडे

SCROLL FOR NEXT