Constipation Home Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Digestion: पोट साफ न होणं बनलंय रोजचं दुखणं? आता नाही त्रास, कारण ‘हे’ उपाय आहेत खास

Constipation Home Remedies:  आजच्या धावपळीच्या जगात बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार ठरत आहेत. यामध्ये पचनाची समस्या तर कॉमन आहे. जर सकाळी फ्रेश वाटत नसेल तर दिवसभर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.

Manish Jadhav

आजच्या धावपळीच्या जगात बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार ठरत आहेत. यामध्ये पचनाची समस्या तर कॉमन आहे. जर सकाळी फ्रेश वाटत नसेल तर दिवसभर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. खरं तर, सकाळी पोट साफ नाही झाले अ‍ॅसिडिटीसह अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. आज (6 जून) आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून पोटाच्या समस्येवर घरगुती रामबाण उपायांबाबत सांगणार आहोत. या टिप्सचे दररोज पालन केल्यास तुम्हाला सकाळी फ्रेश वाटू लागेल. तसेच पचनाची समस्याही छू मंतर होईल. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

दिल्ली येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. रवी के गुप्ता यांनी सांगितले की, जर तुम्हाला सकाळी फ्रेश राहण्यास त्रास होत असेल तर दररोज रात्री तूप आणि पाण्याचे सेवन करा. झोपण्यापूर्वी तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिसळून पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश वाटू लागले.

तुम्हाला हे फायदे मिळतील

डॉक्टर सांगतात, तूप आणि गरम पाण्याचे मिश्रण आतड्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. तूप आतडे स्वच्छ करते. तसेच, आतड्यांमधील दाह देखील कमी करते. पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने मल मऊ होते, ज्यामुळे सकाळी ताजेतवाने होणे सोपे होते.

पचनाच्या समस्यांमुळे कोणत्या समस्या उद्भवतात?

पचनाच्या समस्येमुळे सतत पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवते.

पोटफुगीची समस्या उद्भवते.

कधीकधी जास्त पचनाच्या समस्यांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

हे पोटाच्या कर्करोगाचे देखील एक प्रमुख कारण आहे.

इतर काही पद्धतींचाही अवलंब करा

पाण्याचे सेवन वाढवा.

जेवणात फायबरचे प्रमाण वाढवा.

आतड्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घ्या.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

आम्लयुक्त पदार्थ टाळा.

मीठ घालून लिंबू पाणी प्या.

पुदिन्याची पाने खा.

हर्बल टी प्या.

आल्याचा रस आतड्यांतील जळजळ कमी करतो.

जेवणात हिंग वापरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT