Tips For Constipation  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उपवासात Constipation ची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा

Constipation Remedies: नऊ दिवस उपवास करताना तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर तुम्ही यासाठी काही उपाय करू शकता, ज्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

दैनिक गोमन्तक

नवरात्रात (Navratri) अनेक लोक सुरू नऊ दिवस उपवास करतात. उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो, कारण उपवास शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. अनेक वेळा उपवास केल्याने उर्जेची कमतरता आणि बद्धकोष्ठता यासह अनेक समस्या उद्भवतात. बद्धकोष्ठता अनेक कारणांमुळे होऊ शकते. खरंतर, लोक उपवासाच्या (Fast) दिवसात जास्त चहा पितात, त्यामुळे पोटात गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. चला तर मग जाणून घेऊया उपवासा दरम्यान बद्धकोष्ठता होत असेल तर आराम मिळवण्यासाठी काय करावे.

* बद्धकोष्ठता

प्रथम जाणून घेऊया उपवासात बद्धकोष्ठतेची कारणे कोणती आहेत. अन्नामध्ये फायबरची कमतरता, चहाचे जास्त सेवन, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि सतत अन्न खाणे यामुळे देखील बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अन्न पचण्यासाठी काही वेळ लागतो आणि सतत अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

आता जाणून घ्या बद्धकोष्ठता कशी दूर करावी

* लिंबूपाणी

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर यासाठी तुम्ही शरबताचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही लिंबूपाणी, नारळपाणी(Coconut Water) आणि ताक यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. ते केवळ पोट थंड ठेवत नाहीत तर बद्धकोष्ठता तयार होण्यापासून रोखण्यास मदत करतात. यासोबतच त्यांच्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळीही कायम राहते.

lemon water

चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा

उपवासा दरम्यान चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करा. चहा-कॉफीमुळे अन्न पचण्यास त्रास होतो, त्यामुळे चहा-कॉफीचे सेवन कमी करा.

Coffee

दही नक्की समाविष्ट करा

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दह्यात प्रोबायोटिक्स देखील असतात, जे पचनक्रिया सुधारतात. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT