Headache  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Headache Remedies: बदलत्या वातावरणात वाढलाय डोकेदुखीचा त्रास? मग वापरुन पहा 'हे' घरगुती उपाय

आजकाल डोकेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.

Kavya Powar

आजकाल डोकेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदलांमध्ये ही समस्या आणखी वाढते. पावसाळ्याच्या आगमनाने उन्हापासून दिलासा मिळत असला तरी हवेतील आर्द्रता आणि दमटपणामुळे अडचणीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. डोकेदुखी देखील यापैकी एक आहे. डोकेदुखीमुळे अस्वस्थता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही आजीचे उपाय करून पाहू शकता. इथे घ्या जाणून

डोकेदुखीचे कारण

पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढली की अनेकांना अस्वस्थता आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. वास्तविक, या ऋतूमध्ये शरीराला खूप घाम येतो आणि डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होते. त्यामुळे वेळोवेळी पाणी प्यायला हवे. जेव्हा उष्णता तीव्र असते तेव्हा स्त्रिया आपले केस घट्ट बांधतात. हे देखील डोकेदुखीचे एक कारण असू शकते. जर डोकेदुखी तीव्र असेल आणि कोणताही उपाय कार्य करत नसेल तर एखाद्याने विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी काय करावे

1. जेव्हा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो तेव्हा लगेच थंड पाण्याने अंघोळ करा आणि कपडे बदला. हे तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत करते.

2. यानंतर तुमच्या आवडीचे थोडेसे हेअर ऑइल गरम करा आणि केसांना हलक्या हातांनी मसाज करा किंवा कोणाकडून तरी करून घ्या.

3. महिलांनी केसांना तेल लावताना त्यांना घट्ट बांधू नये.

4. डोकेदुखीच्या बाबतीत, शक्य तितक्या विश्रांती घ्या. फोनपासून अंतर ठेवा.

6. जेव्हाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तेव्हा तुळस आणि मध मिसळून पेय बनवा.

7. तुळशीची पाने धुवून गरम पाण्यात मध मिसळा.

8. काही वेळ पाण्यात ठेवल्यानंतर ते कोमट झाल्यावर एक घोट घेऊन प्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT