Gardening Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Gardening Tips: पहिल्यांदाच घरातील गार्डन सजवत असाल तर 'या' 5 टिप्स करा फॉलो

घरी पहिल्यांदा बागकाम करत असाल तर काय वापरायचे आणि त्यासाठी योग्य जागा कशी निवडायची हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Puja Bonkile

Gardening Tips: अनेक लोक घर सुंदर आणि आकर्षक दिसावे यासाठी घरासमोर गार्डन बनवतात. यामध्ये विविध फुलझाडे आणि रोपे लावतात.

घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये फुलझाडे लावल्याने मानसिक तणाव दूर राहतो. पण समस्या तेव्हा येते जेव्हा घराची बाल्कनी किंवा गार्डन पहिल्यांदाच सजवावी लागते आणि बागकामाशी संबंधित कोणतीही माहिती नसते.

म्हणूनच घरी पहिल्यांदा बागकाम करताना काय वापरायचे आणि त्यासाठी योग्य जागा कशी निवडायची हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हीही पहिल्यांदा तुमचे गार्डन सजवत असाल तर काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

  • योग्य जागा निवडावी

जे लोक शहरात राहतात त्यांच्याकडे घरी गार्डन करण्यासाठी फारशी जागा नसते. अशावेळी बाल्कनी हे एकमेव ठिकाण आहे जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो आणि बागेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

घरामध्ये बागकाम करण्यासाठी नेहमी अशी जागा निवडावी, जिथे झाडांना 5 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळू शकेल. तसेच पुरेसे पाणी मिळेल. याशिवाय उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि जोरदार वाऱ्यापासूनही रोपांचे संरक्षण करता येते.

  • लहान रोप लावावी

जर तुम्हाला बाल्कनीमध्ये बागकाम करायचे असेल तर सुरुवातीला फक्त लहान रोपेच लावावी. जेणेकरून त्यांची काळजी घेणे सोपे जाईल. यासाठी तुम्ही पुदिना, तुळस, कोरफड सारख्या वनस्पती किंवा झेंडूसारखी छोटी फुले, पालक, मुळा यासारख्या वनस्पती लावु शकता. ही झाडे अगदी लहान कुंडीत सहज वाढतात. यानंतर तुम्ही हळूहळू काही मोठ्या वनस्पती देखील लावु शकता.

  • हलक्या कुंड्यांमध्ये रोपे लावा

बाल्कनीमध्ये बागकाम करण्यासाठी हलकी भांडी किंवा कंटेनर वापरावे. असे केल्याने बाल्कनीवर जास्त वजन राहणार नाही. याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवणंही तुम्हाला खूप सोपे होते.

  • सेंद्रिय खत वापरावे

कुंडीत उगवलेल्या सर्व प्रकारच्या वनस्पतींना चांगल्या वाढीसाठी नियमित खत टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी शेणखत, गांडूळखत, ही सेंद्रिय खते झाडांना त्यांच्या गरजेनुसार टाकावी.

याशिवाय झाडांच्या योग्य वाढीसाठी अशा बिया विकत घ्याव्यात जे त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील आणि त्यांची वाढ देखील होईल. जमीन सुपीक होण्यासाठी वाळू, शेणखत, गांडूळ खत इत्यादी सामान्य जमिनीत मिक्स करावे.

  • रोपांना वेळेवर पाणी द्यावे

जर तुमच्या बाल्कनीमध्ये चांगला सूर्यप्रकाश आणि वारा असेल तर झाडांची माती देखील लवकर सुकते. या कारणास्तव, झाडांना वेळेवर पाणी देणे फार महत्वाचे आहे. गार्डनमधील रोपांना पाणी देण्यासाठी तुम्ही वॉटरिंग कॅन टूल वापरू शकता. हे साधन 5 ते 10 लिटर क्षमतेचे असेत. तुमच्या बाल्कनीमध्ये असलेल्या रोपांच्या संख्येनुसार तुम्ही वॉटरिंग कॅन निवडू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT