Holi Special: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Special: होळी खेळल्यानंतर 'या' घरगुती पद्धतीने घ्या त्वचेची काळजी

Holi Special: होळी खेळल्यानंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

holi special 2024 how to take care of skin

त्वच उजळ आणि चमकदार दिसण्यासाठी योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी बाजारात अनेक उत्पादने मिळतील. यंदा होळी 25 मार्चला साजरी केली जाणार आहे. हा सण रंगाचा सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात. चेहऱ्याचे रंगांपासून बचाव करणे गरजेचे असते. चेहऱ्यावर रंग लावल्याने त्वचेला अनेक प्रकारची हानी होते. पण तुम्ही घरगुती गोष्टींच्या मदतीने होळीच्या वेळी रंगांपासून तुमच्या त्वचेचे सहज काळजी घेऊ शकता.

एलोवेरा जेल

चेहऱ्यावरील रंग काढण्यासाठी तुम्ही कोरफड जेलटा वापर करू शकता. तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर एलोवेरा जेलचा वापर करून हलक्या हाताने मसाज करा आणि चेहऱ्यावरील होळीचे हे रंग व्यवस्थित काढून टाका. या उपायाने चेहऱ्यावरील रंग 2 ते 3 दिवसात कमी होईल.

चेहऱ्यावर कोणते ऑइल लावावे

त्वचा रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे तेल किंवा उत्पादन चेहऱ्यावर लावू नका. असे करण्याआधी तुम्ही सल्ला घेऊ शकता आणि चेहऱ्यावर खोबरेल किंवा बदामाचे तेल लावून आणि हलक्या हातांनी मालिश करून होळीचे हे रंग काढून टाकू शकता. यामुळे त्वचेवरील होळीचे रंग दूर होण्यास मदत होईल. तसेच त्वचेला योग्य प्रकारे मॉइश्चरायझ करण्यातही मदत होईल.

चेहऱ्यावर घरगुती मास्क वापरा

घरगुती गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुमच्या चेहऱ्यावरील होळीचे रंग काढून टाकण्यासाठी तुम्ही होममेड फेस मास्क देखील वापरू शकता. यासाठी तुम्ही पपई आणि मध मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. हा फेस मास्क केवळ रंग काढून टाकण्यास मदत करेल असे नाही तर तुमची त्वचा पुर्णपणे स्वच्छ करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT