Herbal Color:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Herbal Color: मेकअपच्या 'या' गोष्टीपासून बनवू शकता हर्बल कलर

Herbal Color For Holi: अनेक लोक होळी खेळण्यासाठी बाजारातून रसायनयुक्त रंग आणतात. हे रंग त्वचेसाी हानिकारक ठरू शकतात. यामुळे पुढील पद्धतीने तुम्ही हर्बल रंग तयार करू शकता.

Puja Bonkile

holi herbal color how to make organic natural color

रंगांचा सण होळी यंदा 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. याला रंगांचा सण म्हणतात, मग रंगांशिवाय हा सण कसा साजरा करणार? लोक या दिवशी कुटुंब आणि मित्रांसह रंग खेळण्याचा आनंद घेतात. 

जुने वाद विसरून एकमेकांच्या चेहऱ्यावर गुलालाची उधळण करत एकत्र मस्ती करतात. मात्र, गुलालयुक्त रसायने वापरणे टाळावे. बाजारात अनेक रंग उपलब्ध असतात, ज्यात रसायने असतात. यामुळे त्वचेची अॅलर्जीसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही मेकअप किटमधील पुढील गोष्टींचा वापर करून हर्बल गुलाल घरीच तयार करू शकता. 

तुमच्या मेकअपमध्ये एक वस्तू आहे. त्याचा वापर करून तुम्ही होळीच्या निमित्ताने रंग तयार करू शकता आणि ते म्हणजे टॅल्कम पावडर. विशेष म्हणजे प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये असते. टॅल्कम पावडरपासून सुगंधी हर्बल गुलाल बनवता येते

बाजारातून तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचा फूड ग्रेड रंग खरेदी करा.

यानंतर एक चमचा फूड कलरिंग काढून प्लेटमध्ये ठेवावा.

नंतर त्वचेवर लावण्यात येणाऱ्या पावडरचे 8 ते 10 चमचे त्याच प्लेटमध्ये ठेवा.

यानंतर, चमच्याच्या मदतीने ते चांगले मिक्स करा.

नंतर, प्लेटमध्ये थोडा वेळ सोडा. अर्ध्या किंवा 1 तासानंतर, तुम्हाला दिसेल की ते पूर्णपणे मिसळले आहे आणि सुवासिक गुलाल तयार आहे.

या पद्धतीने तुम्ही लाल, हिरवा, केशर इत्यादी कोणत्याही रंगाचा गुलाल तयार करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदन पावडरही टाकू शकता.

  • होळी खेळताना कोणती काळजी घ्यावी

होळी खेळायला जाताना डोळ्यांना चष्मा लावावा. यामुळे डोळ्यात रंग जाणार नाही.

फुल बायाचे करडे घालावे.

त्वचेला तेल किंवा कोरफड जेल लावावे. यामुळे रंगांपासून हानी होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT