Hing Water Drinking Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hing Water Benefits: हिंगाचे पाणी म्हणजे पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय! 'या' समस्या होतात दूर

औषधी गुणांनी समृद्ध असलेले हे पाणी शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते.

Kavya Powar

Hing Water Drinking Benefits: पोटाच्या समस्यांवर हिंगाचे पाणी रामबाण औषधाचे काम करते. औषधी गुणांनी समृद्ध असलेले हे पाणी शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते. हिंगाचे पाणी गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या लवकर दूर करू शकतात.

वजन कमी करायचे असेल किंवा हृदयविकार टाळायचा असेल तर हिंगाचे पाणी फायदेशीर आहे. एका हेल्थ वेबसाइटनुसार, हिंगाच्या पाण्याचा कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया हिंगाच्या पाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे...

हिंगाचे पाणी कसे बनवायचे

  • एक ग्लास पाणी गरम करा.

  • गरम पाण्यात हिंग मिसळा.

  • पाण्यात हिंग चांगले मिसळा.

  • आता याचे सेवन करा.

हिंगाच्या पाण्याचे 5 फायदे

हृदयविकारापासून संरक्षण

हिंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्याचे काम करते. हे तुम्हाला जळजळ, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवू शकते.

पचन मजबूत करणे

हिंगामुळे पचनक्रिया खूप मजबूत होते. हिंगामुळे अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याचे नियमित सेवन केल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) कमी होऊ शकतो. यामुळे पोटही स्वच्छ राहते.

वजन कमी

दररोज हिंगाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. वास्तविक, हिंग पचन सुधारते आणि वाढलेले पोट कमी करते. यामुळे लठ्ठपणाही कमी होऊ शकतो.

रक्तातील साखर नियंत्रित करा

हिंगाचा दररोज वापर केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. रोज सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने साखरेची पातळी कायम राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी हिंगाचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

चेहऱ्यावर चमक

हिंग आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. याचा वापर केल्याने सुरकुत्या आणि पिंपल्ससारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT