High Blood Pressure And Liver Damage Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उच्च रक्तदाब यकृतासाठी धोकादायक? डॉक्टरांकडून जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

High Blood Pressure And Liver Damage: उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या आजाराची लक्षणे उशिरा दिसून येतात.

Manish Jadhav

High BP Disease Can Also Damage Liver Follow This Prevention Tips

उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. या आजाराची लक्षणे उशिरा दिसून येतात. म्हणूनच या आजाराला 'सायलेंट किलर' म्हणतात. उच्च रक्तदाब हृदय आणि मेंदूवर परिणाम करतो, पण तुम्हाला माहिती आहे का की हा आजार यकृतालाही नुकसान पोहोचवू शकतो? हाय बीपीलिवर फाइब्रोसिसचेही कारण ठरु शकते. जेव्हा यकृत वारंवार खराब होते आणि जखमा होऊ लागतात तेव्हा लिवर फाइब्रोसिस होतो. यामुळे यकृताचे कार्य बिघडू शकते. जर वेळेवर उपचार घेतले नाहीत तर ते लिवर सिरोसिसचेही कारण ठरु शकते. ज्याप्रमाणे हिपॅटायटीस किंवा अल्कोहोलच्या सेवनामुळे यकृताचे आजार होतात, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब देखील यकृताला हानी पोहोचवू शकतो.

उच्च रक्तदाब यकृताला कसे नुकसान पोहोचवते?

मेडिसिन डॉक्टर अजय कुमार यांनी सांगितले की, वाढत्या रक्तदाबामुळे यकृतामध्ये योग्य रक्तप्रवाह होऊ शकत नाही. जर ही स्थिती बराच काळ टिकली तर ती स्टेलेट पेशींना सक्रिय करते. जेव्हा अशा पेशी सक्रिय होतात तेव्हा त्या जास्त प्रमाणात कोलेजन आणि इतर मॅट्रिक्स तयार करु लागतात, ज्यामुळे यकृताला हानी पोहोचते. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल आणि पचनाशी संबंधित समस्या असतील तर हे यकृताच्या हानीचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दररोज बीपी तपासला पाहिजे

डॉ. कुमार यांनी पुढे सांगितले की, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी दररोज बीपी तपासला पाहिजे. जर तो वाढताच राहिला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. बीपीच्या आजाराला कधीही हलक्या घेऊ नका. जर तो यकृताला हानी पोहोचवत असेल तर तो धोकादायक आहे.

या लक्षणांकडे लक्ष द्या

थकवा, अशक्तपणा

पोट भरल्यासारखे वाटणे

कावीळ

वजन कमी होणे

पोट नीट साफ न होणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT