Positive Thoughts क्रिएट करण्यासाठी करा ही '5' कामे  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Positive Thoughts क्रिएट करण्यासाठी करा ही '5' कामे

जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार (Negative Thoughts) वाढू लागतात, तेव्हा पेन घ्या आणि तुमच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण लिहून काढा.

दैनिक गोमन्तक

आपण आयुष्यात (Life) जे काही चांगले-वाईट कामे करतो याचा परिणाम विचारांवर होतो. तुम्ही जर एकदा मनात निश्चय (decision) केला तर कठीण काम देखील सोपे होऊन जाते. परंतु तुम्ही जर सोपे काम कठीण आहे आस विचार केल्यास ते काम होणार नाही. जीवनातील यश (Success) आणि अपयश (Failure) हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. अनेकांच्या मनात नकारात्मक (Negative Thoughts) विचार निर्माण होऊ लागतात आणि हे विचार त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी रोखतात. यामुळेच नकारात्मक विचार (Negative Thoughts) थांबवण्यासाठी काही सोप्या मार्गाबद्दल (Easy Tips) जाणून घेऊया.

* लिखाण करावे

प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात. जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार वाढू लागतात, तेव्हा पेन घ्या आणि तुमच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण लिहून काढा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत मिळेल.

* कामात गुंतून राहणे

जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा मापल्या मनात अनेक वाईट विचार येतात. आपण एकाच गोष्टीवर खूप विचार करतो. आपल्याला माहिती असते की वाईट विचार करून काही मिळणार नाही. अशावेळी आपले मन कोणत्यातरी कामात गुंतवले पाहिजे. असे केल्याने आपली नकारात्मक विचारांपासून सुटका होऊ शकते.

* बाहेर फेर-फटका मारणे

जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात. तेव्हा बाहेर फिरायला जावे, कारण जेव्हा तुम्ही एकटे फिरायला जाता तेव्हा तुमच्या मनातली सर्व वाईट विचार बाहेर पडतात. फिरताना आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गरम्य दृश्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार पळून जातात. तसेच अनेक गोष्टींवर स्वता:शी बोलायला वेळ मिळतो यामुळे आपल्या मनातील वाईट विचार दूर होऊन आपण नवीन काही तरी कर्णयावे लक्ष केंद्रित करतो.

* व्यक्त व्हा

आपल्या परिवारातील किंवा मित्र-मैत्रिणीसोबत आपल्या अडचणी किंवा समस्यांवर बोलायला हवे. असे केल्याने आपल्या मनावरील ताण कमी होऊन आपल्या मनातील नकारात्मक कमी होण्यास मदत मिळेल.

* कारणं शोधा

नकारात्मक विचार तेव्हाच येतात जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी येतात. तेव्हा आपण त्या अडचणी मागचे कारण शोधयला हवे. तसेच त्यावर उपाय देखील शोधायला पाहिजे. एकदा तुम्हाला तुमच्या अडचणीवरील उपाय मिळाले की मनातील नकारात्मक विचार निघून जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT