Cranberry Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Herbal Tea: निरोगी आरोग्यासाठी दूधाऐवजी 'या' फळाचा प्या चहा, मिळतील अनेक फायदे

Herbal Tea: अनेक लोकांची सकाळ चहानेच होते. तुम्ही दूधाऐवजी क्रॅनबेरीचा चहा प्यायल्यास अनेक आजार दूर राहतील.

Puja Bonkile

herbal tea health benefits cranberry tea read full story

फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सामान्यत: निरोगी राहण्यासाठी लोक विविध प्रकारचे फळं खातात. असे काही लोक आहेत ज्यांना फळं खाणे फारसे आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्यांचा आहारात वेगळ्या पद्धतीने समावेश करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला काहीतरी गरम प्यावेसे वाटत असेल तर तुम्ही फ्रूट टी बनवून पिऊ शकता.

क्रॅनबेरीपासूनही असाच चहा तयार करता येतो. क्रॅनबेरी चहा पिण्यास खूप चवदार असून त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. क्रॅनबेरी चहा प्यायल्याने तुम्हाला बरे वाटते तर ते तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करू शकते. 

  • मूत्रमार्गाचे आरोग्य

क्रॅनबेरी चहा मूत्रमार्गासाठी खूप चांगला मानला जातो. खरं तर, क्रॅनबेरीमध्ये प्रोअँथोसायनिडिन नावाची संयुगे आढळतात. जी मूत्रमार्गाच्या भिंतींना ई. कोलाय सारख्या जीवाणूंना चिकटून राहण्यास प्रतिबंध करू शकतात. ज्यामुळे तुमचा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात UTI चा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

  • पचनसंस्थेसाठी फायदेशीर

असे मानले जाते की क्रॅनबेरी चहा प्यायल्याने तुमच्या पचनसंस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा तुम्ही याचे सेवन करता तेव्हा तुम्हाला खूप आराम वाटतो. सुज येणे आणि अपचन यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. इतकेच नाही तर क्रॅनबेरीमध्ये असलेले फायबर आतड्यांच्या हालचालींना नियमित करते आणि त्याच वेळी ते तुमचे आतडे अधिक निरोगी बनवते.

  • तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

क्रॅनबेरी चहा तोंडाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो. त्यात काही गुणधर्म आहेत जे तोंडात बॅक्टेरियाचा संसर्ग रोखतात. त्यामुळे अल्सर आणि हिरड्यांचे आजारही सुरक्षित राहतात. हा चहा तोंडाच्या पोकळीची समस्या दूर ठेवतो.

  • अँटी-ऑक्सीडेंट

क्रॅनबेरी चहा पिण्याचा एक फायदा म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्यात व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्ससह अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करण्यात मदत होते. त्याच वेळी, ते ऑक्सिडेटिव्ह तणाव हाताळण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे तुमचे एकूण आरोग्य सुधारते. काही जुनाट आजारांपासून तुमचे रक्षण करण्यातही ते उपयुक्त आहे.

  • वजन नियंत्रणात राहते

जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा तुमचे वजन टिकवून ठेवायचे असेल, तर क्रॅनबेरी चहा पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, क्रॅनबेरीमध्ये असलेले फायबर घटक तुम्हाला पोट भरल्याचा अनुभव देते, ज्यामुळे तुमचे वजन वेगाने वाढत नाही. हा चहा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, ते गोड पदार्थ खाण्याची लालसा देखील कमी करते. ज्यामुळे फॅटी टिश्यु कमी होतात. या पद्धतीमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT