Heart Care Tips: आजकाल कमी वयात देखील हृदया संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये हृदयविकाराचा झटका, हृदयक्रिया बंद पडणे, हाय बल्डप्रेशर यासारख्या समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह आणि झोपेची समबमधित समस्या देखील हृदयाशी जोडल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये हृदय अचानक काम करणे बंद करते आणि पुरेसे रक्त-ऑक्सिजन पंपकरण्यास सक्षम नसते. यामुळे हृदयाचे स्नायु कमकुवच होतात आणि नीट कार्य करू शकत नाही. हार्ट फेल होण्यापुर्वी शरिराला हे सात संकेत मिळतात.
हृदयाचा गती वाढणे
जेव्हा हृदय जोरात धडधडायला लागते तेव्हा हार्ट फेल्युअरचे हे पहिले लक्षण मानावे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढण्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
घसा खवखवणे
खोकला आणि घसा खवखवण्याची समस्या दीर्घकाळ राहिल्यास किंवा काहीवेळा खोकला असल्यास हार्ट फेल होण्याचे लक्षण आहे. अशावोळी आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
श्वास घेण्यास अडचण
श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या हे देखील हार्ट फेल होण्याचे लक्षण आहे. जेव्हा तुमचे शरीर योग्यरित्या सक्रिय नसते तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते.
मळमळ वाटणे
दिवसभरात जेव्हा अचानक भूक कमी होते आणि उलट्या किंवा मळमळ होते तेव्हा दुर्लक्ष करू नका. अशा वेळी आरोग्यतज्ज्ञा चा सल्ला घ्यावा. कारण यामुळे हार्ट फेल होऊ शकते.
वजन वाढणे
जर शरीराचे वजन अचानक वाढले किंवा शरीराच्या काही भागात सूज येत असेल तर काळजी घ्यावी. कारण पाय, घोट्या, पाय किंवा पोटात सूज येण्याची समस्या हार्ट फेल होण्याचे लभण असु शकते.
खूप थकवा येणे
जेव्हा हृदय योग्यरित्या रक्तप्रवाहित करत नाही, तेव्हा मेंदूला योग्य रक्तपुरवठा होत नाही. अशावेळी हात-पाय कमजोर होतात. गंभीर प्रकरणांमध्ये, पायऱ्या चढताना आणि उतरतानाही थकवा जाणवतो. अशावेळी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.