Methi Paalak Parathe Recipe: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Winter Breakfast: फायबर आणि लोहयुक्त मेथी-पालक पराठे

पालक-मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कमी कॅलरी आणि फायबर युक्त पालक मेथीचे पराठे वजन कमी करण्यासाठी, हृदयविकार आणि पोटासाठी उत्तम आहेत.

दैनिक गोमन्तक

Methi Paalak Parathe Recipe: पालक-मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कमी कॅलरी आणि फायबर युक्त पालक मेथीचे पराठे वजन कमी करण्यासाठी, हृदयविकार आणि पोटासाठी उत्तम आहेत. मेथीमध्ये विरघळणारे आणि नविरघळणारेअसे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, त्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित राहते. पालकामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, पॉली-सॅच्युरेटेड फॅट, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 भरपूर प्रमाणात असतात. त्यात नायट्रेट्स देखील भरपूर असतात आणि ते रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हिवाळ्यात (Winter) पालक-मेथीचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात. जाणून घेवूया मेथू पराठ्याची रेसिपी...

रेसिपी क्विझिन: भारतीय

किती लोकांसाठी: 1 - 2

वेळ: 15 ते 30 मिनिटे

जेवणाचा प्रकार: शाकाहारी

आवश्यक साहित्य

2 कप गेव्हाचे पीठ

1 कप उकळलेली मेथी

1 कप उकळलेली पालक

1/4 टीस्पून गरम मसाला

1/4 टीस्पून लाल मिर्ची पाउडर

1/4 टीस्पून जीरा पाउडर

1/4 टीस्पून जीरा

1/4 टीस्पून ओवा

1/4 टीस्पून मोहरी

स्वादानुसार मीठ

तेल आवश्यकतेनुसार

कृती : - सर्वप्रथम एका भांड्यात पीठ आणि मीठ एकत्र करून त्यात पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. कढईत तेल मध्यम आचेवर ठेवून गरम करण्यासाठी ठेवावे. त्यात जिरे, ओवा आणि मोहरी घालून तडतडून घ्या.

आता त्यात मेथी , पालक, सर्व मसाले आणि मीठ घालून 2 मिनिटे परतून घ्या. भाजीचे सर्व पाणी शोषल्यानंतर गॅस बंद करा. अशाने आता तुमचे स्टफिंग तयार आहे.

आता पिठाचे गोळे करा आणि पुरीएवढ्या आकाराचे लाटून घ्या त्यात एक चमचा सारण टाकून ते पॅक करा.

या सारण भरलेल्या पुरीवर कोरडे पीठ लावून पराठ्याप्रमाणे लाटून घ्या. मध्यम आचेवर तव्यावर थोडं तेल टाकून गरम करायला ठेवा. आता त्यावर पराठा टाका आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

त्याचप्रमाणे सर्व पराठे तयार करा.

आता तुमचे मेथी - पालक पराठे तयार आहेत. दही किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT