Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: मासे अन् चिकन एकत्र खाणे सुरक्षित आहे की नाही? वाचा एका क्लिकवर

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Healthy Tips:  शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी कास काळजी घेणे गरजेचे आहे.  कारण अनेक लोकांना मासे आणि चिकन दोन्ही खायला आवडते. दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक असतात. पण चिकनसोबत मासे खावे की नाही हे जाणून घेउया.

  • ज्या लोकांना ही समस्या आहे त्यांनी मासे आणि चिकन एकत्र खाणे टाळावे

मासे आणि चिकन दोन्हीमध्ये भरपूर प्रथिने असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी चिकन आणि मासे खाणे फायदेशीर असते. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये बरीच विविधता आहे.

ते स्टार्टर म्हणून मासे खातात तर मेन कोर्स म्हणून ते चिकन आणि मटण खातात. ओन्ली माय हेल्थच्या मते, मासे आणि चिकन एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होते असे म्हणता येणार नाही. 

कारण मासे आणि चिकनमध्ये आढळणारी दोन्ही प्रथिने वेगवेगळ्या प्रकारची असतात. अशा परिस्थितीत एका गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे किंवा ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी मासे आणि चिकन एकत्र खाणे टाळावे. कारण यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

Fish
  • मासे आणि चिकन खाताना ही छोटी गोष्ट लक्षात ठेवा

नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी चिकन किंवा मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. कारण दुधात आढळणारे गुणधर्म किंवा दुधात आढळणारे प्रथिने हे कोंबडी आणि मासे यांच्या विरूद्ध असतात. 

त्यामुळे तिन्ही एकत्र खाल्ले तर शरीरावर वाइट परिणाम होउ शकतात. या तीन गोष्टी खाल्ल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात. यासोबतच शरीरात अनेक प्रकारच्या समस्याही दिसू शकतात. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही दही खाऊ नये. दही खाल्ल्याने तुमच्या पोटाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT