Timing of drink tea:
Timing of drink tea:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Timing of Drinking Tea: सकाळी उठल्यानंतर तुम्ही किती वेळाने चहा किंवा कॉफी पिऊ शकता? वाचा सविस्तर

दैनिक गोमन्तक

Timing of Drinking Tea: अनेक लोकांची सकाळ ही चहा किमवा कॉफीने होते.पण अनेक वेळा रिकाम्यापोटी चहा न घेण्याचा सल्ला दिला जातो.

कारण रिकाम्यापोटी चहा पिल्यास तुम्हाला गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या होईल असं सांगितलं जाते. या समस्या तर होतात तर, पण यासोबत मानसिकदृष्ट्याही तुम्ही अस्वस्थ होतात किंवा आजारी पडू शकता.

अलीकडे झालेल्या संशोधनात असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सकाळी उठल्यानंतर 1/2 तासांनंतरच चहा किंवा कॉफीचे सेवन करावे.

  • हाडे कमकुवत करते

रिकाम्या पोटी चहा पिल्यास शरीराला अनेक समस्या निर्माण होउ शकतात. तुनचे हाडे कमकुवत होउ शकते. यासोबतच सामान्य सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. यामुळे वेळीच काळजी घ्यावी.

bones
  • अ‍ॅसिडिटी

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि थोड्यावेळात भूक लागते. असे बरेच लोक आहेत जे सकाळी 3/4 कप चहा पितात. त्यांना नंतर गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

त्यामुळे जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हावे. अन्यथा समस्या उद्भवू शकते.

Acidity
  • पोषक तत्वांची कमतरता

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात हळूहळू पोषक तत्वांची कमतरता जणवते. यामुळे तुम्हाला भूक कमी लागते आणि नंतर तुम्ही बराच वेळ उपाशी राहता त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही.

Vitamin B7 Deficiency
  • चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे

चहा पिल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?

चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. अनेकांना यामुळे अॅसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो.

1. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असेल तर काळजी घेतली पाहिजे, कारण यामुळे अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो.

2. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. घसादुखीची समस्या देखील असू शकते. म्हणूनच वडीलधारी माणसे असे न करण्याचा सल्ला देतात आणि याला वाईट सवय म्हणतात.

3. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काहींच्या नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास विलंब न करता डॉक्टरांना दाखवावे आणि ही वाईट सवय सोडून द्यावी.

4. चहा पिल्यानंतर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर दातांमध्ये पिवळेपणा, संवेदनशीलता यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

  • चहा-चपाती खाण्याचे तोटे

1.आम्लता वाढते

चहा आणि चपाती हे दोन्ही जड पदार्थ आहेत आणि जर तुम्ही असा जड नाश्ता सकाळी खाल्ल्यास त्यामुळे अॅसिड रिफ्लक्स होते आणि पोटात अॅसिडचे संतुलन राखले जात नाही, ज्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो.

2. अशक्तपणाच्या तक्रारी

संशोधनानुसार, चहामध्ये फेनोलिक नावाचे रसायन आढळते, जे पोटाच्या अस्तरात लोह कॉम्प्लेक्स वाढवते, ज्यामुळे शरीराला पुरेसे लोह मिळत नाही.

अशा परिस्थितीत ज्यांना आधीच लोहाची कमतरता आहे किंवा अशक्तपणा आहे त्यांनी चहा चपाती एकत्र खाऊ नये आणि जरी तुम्हाला अशक्तपणा टाळायचा असेल तर चहा चपाती खाणे तुमच्यासाठी हानिकारक आहे.

3. पोषक द्रव्ये शोषून घेते

चहामध्ये आढळणारे टॅनिन प्रथिनांच्या संयोगाने प्रतिपोषक घटकांसारखे वागतात. एका संशोधनानुसार, टॅनिन या प्रथिनांचे पचन सुमारे 38% कमी होते, त्यामुळे चहासोबत पराठा खाणे आरोग्यदायी आहार नाही.

4. चहाचे सेवन कसे करावे

जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल आणि चहाशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही, तर तुम्ही जेवणानंतर किमान 45 मिनिटांनीच चहा प्यावा. न्याहारी किंवा दुपारच्या जेवणानंतर फक्त 1 तासाने चहा प्या आणि तुम्ही संध्याकाळी काही स्नॅक्ससह चहाचा आनंद घेऊ शकता.

दिवसाची सुरुवात अशी करा

जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी करायची असेल, तर साखर आणि दुधाचा चहा पिण्याऐवजी तुम्ही हर्बल टी, मध आणि लेमन टी किंवा साधे कोमट पाण्याने तुमचा दिवस सुरू करू शकता. त्यानंतर अर्धा किंवा 1 तासानंतर तुम्ही चहाचा आस्वाद घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT