Fruits Eating Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fruits Eating Tips: उन्हाळ्यात चुकीच्या पद्धतीने फळं खाल्यास बिघडून शकते डायजेशन

उन्हाळ्यामध्ये आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात फळे खाण आरोग्यासाठी खूप लाभदायी असते. फळे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी ब्रेकफास्टमध्ये फळांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या (Summer) आंबा, संत्री, टरबूज, खरबूज या फळांचा सेवन करणे फयदेशीर असते. पण उन्हाळ्यात फळे खाताना जपून खावे. चुकीच्या पद्धतीने फळं खाल्यास पचना संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. (Fruits Eating Summer Tips)

या चुकीच्या पद्धतीने फळं खाणे टाळावे

* उन्हातून आल्याबरोबर फळं खाऊ नये

तुम्ही जर उन्हातून आला असाल तर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका. बाहेरून आल्यावर शरीरायचे तपमान अधिक असते. यामुळे फळे खाल्ल्याने शरीरातील उष्णतेचा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊन तुम्हाला उलट्या , लूज मोशन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

* उन्हात ठेवलेली फळं आणताच लगेच खाऊ नका

बाजारामधून आणलेले फळे लगेच खाऊ नका. जसे की टरबूज, खरबूज किंवा आंबा घरी आणल्यावर स्वच्छ धुवून किमान तासभर थंड पाण्यात ठेवा.

* उन्हाळ्यात फळांवर पाणी पिणे टाळावे

आयुर्वेदानुसार कोणतेही फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. फळे नैसर्गिकरीत्या गोड असतात, त्यामुळे अनेकांना फळं खाल्ल्यानंतर खूप तहान लागते, परंतु असे केल्याने तुम्हाला हिरड्यांचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर पोटदुखी, अॅसिडिटीचा धोकाही असतो.

* फळे कापून जास्त वेळ ठेवू नका

उन्हाळ्यात (Summer) अनेक पदार्थ लवकर खराब होतात. तसेच फळे देखील कापून ठेवल्यास खराब होऊ शकतात. फळांतील पोषक तत्वे नष्ट होतात,

त्यामुळे फळे ताबडतोब कापून खावीत. फळं जास्त वेळ उघडी ठेवू नका.

* फळे शिजवू नका

आयुर्वेदानुसार फळं कधीही शिजवू नयेत. यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित (Health) समस्या निर्माण होऊ शकतात.

* चहा-कॉफीसोबत फळे खाऊ नका

फळे चहा-कॉफीसोबत कधीही खाऊ नयेत. असे केल्याने तुम्हाला त्वचेची ऍलर्जी आणि पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. फळ (Fruits) खाल्ल्यानंतर फक्त एक तासाने चहा आणि कॉफी घ्या. जर तुम्ही चहा-कॉफी प्यायले असाल तर लगेच फळे खाऊ नका. एक-दोन तासांचे अंतर ठेवून फळांचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT