Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Curd Rice Healthy Tips: 'या' दोन पांढऱ्या गोष्टी एकत्र करून खाल्ल्यास बीपी राहील नियंत्रणात

Curd Rice Healthy Tips: हे दोन पांढरे पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास अनेक आजार दूर राहतील.

Puja Bonkile

Curd Rice Healthy Tips: अनेक लोकांचे जेवण दही आणि भाताशिवाय पूर्ण होत नाही. बहुतेक लोक एका वेळी त्यांच्या आहारात भात किंवा दही यांचा समावेश करतात.

तुम्ही नेहमी भातासोबत डाळी आणि भाज्या खातात, पण त्यासोबत दह्याचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 

दही आणि भात एकत्र करून खाल्ल्याने एक किंवा दोन नव्हे तर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो.

दही आणि भाताचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारतेच शिवाय त्वचाही चमकदार होते. यामुळेच अनेक आरोग्य तज्ज्ञ आहारात दही-भाताचा समावेश करण्याचा सल्ला देतात. 

भात आणि दही या दोन्ही पदार्थांचा गुणधर्म हा थंड आहे, पण त्यात अनेक पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. दह्यासोबत भात एकत्र केल्याने पोषक तत्वांचे प्रमाण दुप्पट होते.

तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात भात आणि दही यांचा समावेश करू शकता. चला जाणून घेऊया भातामध्ये दही मिक्स करून खाण्याचे कोणते होतात.

वजन कमी

जर तुम्ही वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर नियमितपणे भातासोबत दह्याचे सेवन करावे. अतिशय हलका आहार असण्यासोबतच हा एक आरोग्यदायी आहार देखील आहे. हे रोज खाल्ल्याने तुमचे वजन आपोआप कमी होऊ शकते.

रक्तदाबही नियंत्रणात राहील

आजच्या काळात वृद्धांव्यतिरिक्त तरुण आणि लहान मुलांनाही रक्तदाबाची समस्या भेडसावत आहे. अनेक लोक उच्च रक्तदाब या आजाराला बळी पडत आहेत.

यामुळे हृदयापासून मेंदूपर्यंत अनेक धोके वाढतात. अशावेळी उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी दही आणि भाताचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. 

थकवा कमी होतो

जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर दही आणि भाताचा आहारात समावेश करावा. हे शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम करते. तसेच तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दही-भात खावा.

त्वचा चमकू लागते

भात आणि दही एकंदर आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. ते खाण्याव्यतिरिक्त दह्याची पेस्ट त्वचेवर लावल्याने रंग सुधारतो. दह्याचे नियमित सेवन केल्याने नैसर्गिक चमक वाढते. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT