Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: तुम्हीही जेवणात 'या' 4 चुका करत असाल तर होउ शकतो 'मधुमेह'

अनेक लोक जेवतांना बऱ्याच चुका करतात यामुळे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते.

दैनिक गोमन्तक

Healthy Tips: सकस आणि पोषक आहार घेतल्यास आणि लाईफस्टाइलमध्ये काही महत्वाचे बदल केल्यास मधुमेह तसेच अनेक आजार दुर ठेवता येईल. सध्या मधुमेह हा असा आजार आहे जो लहान मुलांदेखील होतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकस आहार घेणे आणि योग्य लाईफस्टाइल असणे गरजेचे आहे.

काही लोक आपल्या आरोग्याला घेउन चुका करतात. यामुळे मधुमेह या आजाराला बली पडतात. हा आजार असणाऱ्या लोकांना माहिती असणे आश्यक आहे की कोणत्या चुकांमुळे ब्लड शुगर वाढू शकते. चला तर मग जाणून घेउया अशाच काही गोष्टींबद्दल ज्यामुळे मधुमेह आजार होउ शकतो.

1. दही

दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण नियमित दह्याचे सेवन करणे योग्य नाही. आयुर्वेदात असेही सांगितले आहे की रोज दही खाल्ल्याने वजन वाढते. तसेच पचनसंस्था बिघडु शकते. यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होउ शकतो. 

2. रात्री जेवण जास्त

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की रात्रीचे जेवण नेहमी हलके करावे. पण काही लोक असे असतात, जे रात्री पोटभर जेवण करतात. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करत नाही.

3. जास्त खाणे

अनेक वेळा असे दिसून येते की काही लोकांना अन्न फेकणे आवडत नाही, म्हणून गरज नसतांना देखील खातात. असे म्हटले जाते की जेवढी भुक असते तेवढेच खाल्ले पाहिजे.कारण जास्त खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजार होउ शकतात. भुकेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, पचनाच्या समस्या आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो, असेही आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे.

4. भूक नाही, तरीही खाणे

भूक नसतांनाही खाणे हे देखील आजारांना बळी पडण्याचे एक कारण आहे. जर तुम्हाला भूक नसेल आणि तरीही तुम्ही अन्न खात असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःच आजारांना आमंत्रण देत आहात. या सवयीमुळे तुम्हाला डायबिटीजचे शिकार तर होईलच पण इतर अनेक आजारांचा धोकाही वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT