Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: 'हे' ड्रायफ्रुट्स 7 दिवसात सांधेदुखीची समस्या करतील दूर

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने सात दिवसात सांधेदुखीची समस्या कमी होईल.

Puja Bonkile

Healthy Tips: थंडाला सुरूवात झाली आहे. या दिवसांमध्ये सर्दी, खोकला सारखे अनेक आजार निर्माण होतात. पण अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो. सांधेदुखीमुळे कोणतेही काम करणे अवघड होते. रोजचे सोपे कामे करण्यातही अडचण येतात. सांध्यांमध्ये लुब्रिकेशन नसणे आणि कार्टिलेजमध्ये झीज होणे ही सांधेदुखीची प्रमुख कारणे आहेत. बदलत्या हवामानामुळे जास्त वेदना होतात. ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.

1) भिजवलेले अक्रोड

अक्रोड खाल्ल्याने सांधेदुखीची समस्या कमी होते. कारण ते ओमेगा -3 फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध असतात. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जसे की हेल्दी फॅट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे, जे सांधेदुखी आणि सूज दूर करतात.

  • पद्धत

1 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.

सकाळी चावून खावे आणि पाणी प्यावे.

2) अंजीर

अंजीर वात दोष नियंत्रित करते. सांधेदुखीचे हे सर्वात मोठे कारण आहे. तसेच, यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे आणि सांधे मजबूत करते आणि वेदना कमी करते. याशिवाय अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे पोट सहज साफ होते.

  • पद्धत

2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.

सकाळी खावे आणि पाणी प्यावे.

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर अंजीर खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

3) बदाम

बदामामध्ये मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट्ससह ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म वेदना कमी करतात. तुम्हाला जल सांधेदुखीची समस्या असेल तर तुम्ही भुजवलेले बदाम खाल्ले पाहिजे.

  • पद्धत

5 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.

सकाळी बदाम सोलून सकाळी खावे.

4) मनुका

मनुका खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे सांधेदुखी समस्या दूर होते. तसेच आहारातील फायबर आणि फायटोकेमिकल्सचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

  • पद्धत

मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे.

हे मनुके सकाळी रिकाम्या पोटी खावे.

यामुळे साध्यांमध्ये जमा झालेले युरिक अॅसिड सहज निघून जाईल.

5) खजुर

भिजवलेले खजूर खाल्ल्याने कॅल्शियमसोबत फायबर, सेलेनियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि तांबे मिळतात. यामुळे हाडांचे आरोग्य मजबूत राहते. यामुळे सांधेदुखी आणि अशक्तपणापासून आराम मिळतो. तसेच खजुरमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

  • पद्धत

रोज रात्री वाटीभर पाण्यात 2/3 खजूर भिजवावे.

सकाळी उठल्यावर खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT