Neem Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Neem Benefits: सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे पाने चघळणे आरोग्यदायी

Neem Benefits: घरगुती उपायांमध्ये देखील कडुलिंबाचा वापर केला जातो.

दैनिक गोमन्तक

Benefits of Eating Neem on Empty Stomach: आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला खुप महत्व आहे. कडुलिंबाची चव कडू असली तरी त्यात अनेक औषधीयुक्त गुणधर्म आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

आयुर्वेदानुसार रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे काणते?

  • रक्तातील साखरेवर नियंत्रण

चुकीच्या लाइफस्टाइलमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोक अजूनही घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात.

यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करणे होय. असे केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. 

  • पोटासाठी फायदेशीर

कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या कमी होते.  

  • रक्त शुद्ध ठेवणे

कडुलिंबामध्ये असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करतात. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते.

तुमचे रक्त शुद्ध राहिल्यास तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. यामुळे कडूलिंबाचे पाने सकाळी रिकाम्या पोटी खाणे फायदेशीर ठरते.  

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

एवढेच नाही तर सर्दी आणि ताप सारखे आजार बरे करण्यासाठी याचा वापर केला जातो.

  • कडुलिंबाची पानांचा कसा वापर करावा

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेल्या रसाचे सेवन केले जाते. ताज्या कडुलिंबाच्या पानांचे रसाचे नेहमी सेवन करावे.

हवं असल्यास कडुनिंबाची पानं तव्यावर कोरडी भाजून, हाताने मॅश करून, त्यात लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता.

  • कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी

एका वेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका. कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल असे अनेकांना वाटते.

पण याचे नेहमी कमी प्रमाणात सेवन करावे. जर तुम्हाला आजार असेल तर सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT