Misophonia Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: घडाळ्याची टिक टिक, शिंक, खोकल्याच्या आवाजाचा होतोय त्रास? वेळीच व्हा सावध, कारण...

तुम्हाहाली घडाळ्याची टिक टिक, शिंक, खोकला, खाण्याच्या आवाजाचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Puja Bonkile

Healthy Tips: तुम्हाहाली घडाळ्याची टिक टिक, शिंक, खोकला, खाण्याच्या आवाजाचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अशा आवाजाचा त्रास होणे म्हणजे तुम्ही एका गंभीर आजाराला बळी पडू शकता. या आजाराचे नाव मिसोफोनिया असे आहे. हा एक मानसिक आजार असून यामध्ये कोणत्याही आवाजाकडे लगेच लक्ष जाते. यामुळे कानात सारखा तोच आवाज येतो.

तसेच खाण्याचा आवाज, गिळण्याचा आवाज किंवा श्वास घेण्याच्या आवाजाने चिजचिड होऊ होते. यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की मेसोफोनियाचे काही वैज्ञानिक कारण नाही. पण संशोधनात असेही आढळून आले की या आजाराने पिडित असलेल्या रूग्णाचा मेंदु खुप अॅक्टिव होतो. हेच या समस्येचे कारण बनले आहे.

मेसोफोनियाचे लक्षणे

या आजाराबद्दल लोकांना जास्त माहीती नाही. या आजाराने पीडित असलेल्या रूग्णांना शिंकणे, खोकणे, गिळणे, श्वास घेणे, यासारख्या आवाजांमुळे त्रास होतो. यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. पुढील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

1) घाम खुप येतो

2) हृदयाचे ठोके वाढतात

कारण

मानसिक आजार उद्भवण्याचे ठोस कारण नाही, परंतु काही घटना आणि शारिरिक-सामाजिक बदलांमुळे मानसिक आजार निर्माण होतात. जसे की परिवारात कोणाला मानसिक समस्या असेल, तणाव आणि लहानपणातील अत्याचारामुळे मेंदुवर परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान विषाणूंचा संसर्ग, अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणे हे देखील कारण असु शकते.

चिंता

मिसोफोनियाचा थेट संबंध चिंता, राग, तणाव यासारख्या गोष्टींशी आहे असे मानले जाते. त्रासदायक आवाज प्रतिसादावर भावनिक किंवा काही प्रकरणांमध्ये शारीरिकरित्या प्रभावित करू शकतात. या आजाराचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आले नाही. आरोग्य तज्ज्ञांनी दुजारा दिला आहे की श्रवण विकार म्हणजेच तुमच्या कानाची समस्या मानसिक विकाराचे कारण नाही. याला अंशत: मानसिक आणि शारिरिक आजार म्हणता येईल तसेच मेंदुवर आधारित आजार देखील म्हणता यईल.

या आजारावर उपचार आहे का?

या आजारावर उपचार नाही असे नाही. तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. मिसोफोनिया मानसिक आजार आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होतो. म्हणून, सर्व तज्ज्ञ सर्वात पहिले लाइफस्टाइल बदलण्याचा सल्ला देतात. या आजारावर अनेक प्रकारच्या थेरपी आणि काउंसलिंग फायदेशीर ठरतात.

अशाच एका पद्धतीमध्ये, मिसोफोनियाने पिडित असलेल्या व्यक्तीला सहा ते बारा आठवडे वेगवेगळ्या आवाजांच्या संपर्कात ठेवून त्याची चाचणी केली जाते. त्याला कोणत्या आवाजाचा त्रास होतो याची नोंद केली जाते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू केले जातात.

कोणती काळजी घ्यावी

  1. गोंधळापासून दूर राहावे.

  2. 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्यावी.

  3. रात्री उशीरापर्यंत जागू नका.

  4. सकाळी लवकर उठावे.

  5. नियमितपणे व्यायाम करावे.

  6. जास्त स्ट्रेस घेणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT