Tea  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tea Tips: हळद अन् द्राक्षांनी सकाळचा चहा असा करा आरोग्यदायी

Healthy Tea Tips: तुम्हाला जर तुमचा चहा गोड पाहिजे असेल तर त्यामध्ये मध घालू शकता.

दैनिक गोमन्तक

Healthy Tea Tips: आपल्यापैकी अनेकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा बऱ्याचजणांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. मात्र चहाच्या अतिसेवनामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्यदायी चहाचे सेवन करणे गरजेचे असते.

चला जाणून घेऊयात चहाचे असे पाच प्रकार ज्यांच्या सेवनामुळे तुम्हाला चहाचा आस्वाद तर घेता येईलच पण त्याचबरोबर तो चहा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील असेल.

१. हळदीचा चहा

केटलमध्ये 500 मिली पाणी उकळवा. हळद, आले आणि संत्र्याचा रस एका चहाच्या भांड्यात एकत्र करा. हे एकत्र मिश्रण चांगले उकळू द्या. पाच मिनिटानंतर गॅसवरुन हे भांडे उतरवून द्या.

हे मिश्रण आता गाळून घ्या, त्यात लिंबाचा थोडा रस घाला. तुम्हाला जर तुमचा चहा गोड पाहिजे असेल तर त्यामध्ये मध घालू शकता.

2. ग्रीन टी आणि द्राक्षे

आता द्राक्षे बाजारात दिसू लागली आहेत. यावेळी तुम्ही ग्रीन टी आणि द्राक्षे एकत्र करुन आऱोग्यदाय़ी चहा बनवू शकता.

एका भांड्यात 150 मिली थंड पाणी घ्या त्यात नंतर 450 मिली उकळते पाणी मिक्स करा. या पाण्यात चहाची पाने टाका. ही पाने २ मिनिटे तशीच राहू द्या.

आता दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करा. चहा शिजला की चहाच्या भांड्यात पाणी ओता आणि मग त्यात द्राक्ष घाला. ग्रीन टी गाळून घ्या. ही पाने फेकून देऊ नका - तुम्ही त्याच दिवशी दुसऱ्यांदा चहा बनवण्यासाठी त्याचा उपयोग करु शकता.

काहीवेळ द्राक्षे भिजल्यानंतर चहा पिण्यासाठी तयार आहे. चहा गोड हवा असेल तर त्यामध्ये मध मिक्स करायला विसरु नका.

याशिवाय तुम्ही लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लू टी यासारख्या विविध चहांचा त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी विविध चवीसाठी आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT