lifestyle |oats  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Food: स्वादिष्ट अन् हेल्दी व्हेजिटेबल ओट्सचा घ्या आस्वाद

Healthy Food: आज आम्ही तुमच्यासाठी व्हेजिटेबल ओट्सची एक मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत

दैनिक गोमन्तक

Vegetable Oats Recipe:  शरीरात जास्त कॉलेस्टेरॉल असणे ही धोक्याची घंटा आहे. तेलकट अन्न खाणे, व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, धूम्रपान आणि मद्यपान करणे यामुळे कॉलेस्टेरॉल वाढते. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त कॉलेस्टेरॉल जमा होते, ज्यामुळे आजार होतात. खराब कॉलेस्टेरॉलमुळे (Cholesterol) पोटाची चरबी वाढते, त्वचा काळी पडते आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर कॉलेस्टेरॉलची पातळी गंभीर पातळीवर पोहोचली तर हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येण्याचा धोका वाढू शकतो. हिरव्या भाज्या आणि ओट्सचे सेवन आरोग्यासाठी (Healthy) लाभदायी ठरते. ओट्सचे (Oats) कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेउया.

व्हेजिटेबल ओट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 1 कप ओट्स

  • 1 चिरलेला कांदा

  • 1 टोमॅटो चिरलेला

  • 4-5 बीन्स

  • 1 चिरलेली सिमला मिरची

  • 1 चिमूट लाल तिखट, काळी मिरी, ओरेगॅनो, हळद, मोहरी

  • 7-8 कढीपत्ता

  • चवीनुसार मीठ

  • 2 चिमूट चाट मसाला

  • 1 टीस्पून ऑलिव्ह ऑइल

व्हेजिटेबल ओट्स बनवण्याची कृती

  • एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा

  • गरम तेलात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला.

  • यानंतर कांदा घालून हलका शिजवून घ्या, नंतर टोमॅटो घाला.

  • आता बाकीच्या भाज्या पण टाका आणि हळद-मीठ टाकल्यावर थोडा वेळ शिजवा.

  • थोड्या वेळाने सर्व मसाले घालून भाज्या शिजू द्याव्यात.

  • यानंतर त्यात ओट्स घालून थोडे परतून घ्या.

  • आता मीठ आणि थोडे पाणी मिक्स करून मंद आचेवर शिजू द्या.

  • 5 ते 6 मिनिटे शिजवल्यानंतर, तुमची व्हेजिटेबल ओट्स तयार आहेत.

  • गरम व्हेजिटेबल ओट्सचा आस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT