Healthy Food | Cabbage Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Food: कोबीपासून बनवा हे 2 पदार्थ,चवीसह आहेत आरोग्यदायी

Healthy Food: कोबीचे नाव ऐकताच अनेकांचे नाक आणि तोंड मुरडायला सुरुवात होते.पण पुढील पदार्थांचा चव चाखून आता असे होणार नाही.

Puja Bonkile

healthy food delicious cabbage recipe good for healthy life

मोजोस, मंचुरियन, चाऊमिन अशा अनेक पदार्थांमध्ये कोबीचा वापर केला जातो. यामुळे पदार्थांची चव देखील वाढते. पण ही भाजी खायला खूप मेहनत घ्यावी लागते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये समाविष्ट असलेली कोबी आरोग्यदायी आहे.

यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई मुबलक प्रमाणात असते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम आणि फोलेट देखील असतात. जे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यात प्रभावी आहेत. याशिवाय त्यातील दाहक-विरोधी तत्व पचनक्रिया सुरळित ठेवते.

जर तुम्हाला हे सर्व पोषक तत्व शरीराला पुरवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या आहारात कोबीचा समावेश करावा लागेल. जर तुम्हाला भाजी खायला आवडत नसेल तर पुढील पदार्थ ट्राय करू शकता.

कोबी सूप

- कुकरमध्ये दोन कप पाणी आणि हळद घालून गाजर, कॉर्न आणि कोबी दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.

- त्यानंतर सर्व भाज्या पाण्यातून काढा नाहीतर त्यांचा रंग बदलू लागतो.

- नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि बारीक झाल्यावर पॅनमध्ये दोन ते तीन मिनिटे शिजवा. तुमचे सूप तयार आहे. एका भांड्यात काढा आणि वर पनीरचे चौकोनी तुकडे घाला.

- काळी मिरी आणि मीठ एकत्र करून सर्व्ह करा.

कोबी वडा

एक वाटी उडीद डाळ आणि एक वाटी हरभरा डाळ पाण्यात रात्रभर भिजवून त्यात जिरं आणि मिरपूड घालून बारीक करा.

त्यानंतर आलं, हिरवी मिरची आणि धणे मिक्स करून कोबी बारीक करा. नंतर मसूर डाळीच्या पिठात मिक्स करा.

नंतर त्यात लाल मिरची, गरम मसाला, मीठ सोबत चिरलेली सिमला मिरची आणि गाजर घालून मिक्स करा.

याचे छोटे छोटे गोळे करावे.

नॉन-स्टिक पॅनला तेलाने ग्रीस करून त्यावर हे वडे डिप फ्राय करा.

तुम्ही अगदी कमी तेलात एअर फ्रायरमध्ये शिजवून शकता.

कोबी वडा पुदिना किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

SCROLL FOR NEXT