Healthy Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Diet: तुमच्या रोजच्या आहारात 'या' 6 सुपरफुडचा समावेश करा

निरोगी राहण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Healthy Diet: बदलत्या वातावरणात आणि धावपळीच्या जीवनात लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेक आजारांना लोक बळी पडत आहे. यामुळे निरोगी आणि फिट राहण्यासाठी आहारात पोषक आणि योग्य पदार्तांचे सेवन करणे गरजेचे आहे. हे पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया.

बदाम

बदाम खाणे त्वचा, केसांसह आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. बदाममध्ये व्हिटॅमिन इ, मॅग्नेशिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात. बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच टाइप-2 मधुमेह,ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

पालेभाज्या

निरोगी आणि फिट राहण्यासाठी रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन अ आणि सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. पालेभाज्यांमध्ये पालक,मेथी, चवळी यासारख्या भाज्यांचा समावेश करता येतो. तुम्ही पालकाची भाजी किंवा सुप करून सेलन करू शकता.

रताळ

रताळ हे एक कंदमुळ आहे. यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन अ ऐणि सी मुहलक प्रमाणात असते. तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसचे पोटासंबंधित अनेक समस्या दूर ठेवते. वजन कमी करायचे असेल तर रताळाचा आहारत समावेश करावा.

हळद

प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात हळद असते. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. हळदीमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, लोह मुहलक प्रमाणात असते. हळदीचा वापर तुम्ही विविध प्रकारे करू शकता. तुम्ही हळदीचे दूध प्यायलास शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडंट,व्हिटॅमिन इ, फॅटी अॅसिड यासारखे अनेक पोषक घटक असतात. ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.ऑलिव्ह ऑइलचे नियमितपणे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

कडधान्य

रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश करणे फायदेशीर असते. कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. तसेच कडधान्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच रोजच्या आहारात कडधान्यांचा समावेश केल्याने प्रोटीनची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT