Summer Health care  Dainika
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात अशक्तपणा जाणवत असेल तर 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

जर उन्हाळ्यात तुम्हाला अशक्तपणा येत असेल तर या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

दैनिक गोमन्तक

धावपळीच्या काळात लोकांना स्वत: कडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी सर्वत्र 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. खाण्या-पिण्याची योग्य वेळ पाळली जात नाही. अवेळी जेवण केल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे आपल्या आहारात (Diet) पुढील पदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे.

* पालक

पालक मध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. यामुळे आपल्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात. पालक हे व्हिटॅमिन ए आणि के यांचा चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

* बीट

बीटमुले शरीरातील रक्तामध्ये वाढ होते. तसेच स्मृतिभ्रंशाचा धोकाही कमी होतो. या भाज्यांमध्ये फॉलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटकांचा समावेश असतो.

* लिंबू

लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन हे मुबलक प्रमाणात असते. यामुळे यकृत आणि आतड्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे.उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्यास शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

* डार्क चॉकलेट

चॉकलेटमध्ये उच्च अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास चॉकलेट मदत करते.

* कडधान्ये

कडधान्य सुपरफूड मानले जाते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे आपल्या हृद्यायाचे आरोग्य चांगले राहते. तसेच रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

* अक्रोड

अक्रोड हे एक सुकामेवा असून आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अक्रोड रक्तवाहिन्यांमधील जळजळ तसेच ऑक्सिडेशन कमी करते. दररोज किमान 8 अक्रोड खावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT