Diabetes Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Care Tips: कारले मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान! कसे सेवन करायचे ते घ्या जाणून

कारल्यामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त करू शकतात.

दैनिक गोमन्तक

कारल्याच्या कडूपणामुळे त्याची भाजी अनेकांना आवडत नाही. कारल्याचं नाव ऐकताच काही लोकांच्या भुवया आणि नाक मुरडायला लागतात. त्याची चव कडू असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्याचे गुणधर्म खूप फायदेशीर असतात.

कारल्यामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्त करू शकतात. साखरेच्या रुग्णांसाठी कारले अमृतापेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया कारल्याचे फायदे आणि त्याचा कडूपणा दूर करण्याचे उपाय...

कारले मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान

जर तुम्ही मधुमेहाने त्रस्त असाल तर कारले तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारल्याचा रस पिऊन तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. कारल्याच्या रसामध्ये इन्सुलिनसारखे प्रोटीन आढळते. त्याला पॉलीपेप्टाइड पी म्हणतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे आश्चर्यकारक प्रभाव दर्शवते.

कारल्याचा तुरटपणा कसा काढायचा

कारले कडू असल्यामुळे तुम्ही जर ते खात नसाल, तर त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. या उपायांनी कारल्याचा तुरटपणा संपतो आणि चवही बदलते.

1. कारल्यावर कोरडे पीठ आणि मीठ घाला आणि सुमारे एक तास सोडा. यानंतर त्याचा कडूपणा निघून जाईल आणि चवही बदलेल.

2. कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात 2 ग्लास पाणी आणि तांदूळ भिजवा आणि त्यात कारल्याचे तुकडे सुमारे 1 तास भिजत ठेवा. तुरटपणा कमी होईल.

3. कडूपणा दूर करण्यासाठी, कारले मिठाच्या पाण्यात भिजवून खाऊ शकता.

4. तुम्हाला हवे असल्यास वाळलेल्या कैरीची पावडर टाकून तुम्ही कारल्याचा कडूपणा दूर करू शकता. त्याची भाजी खूप अप्रतिम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT