Health Tips For Migraine Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Migraine : 'या' Nutrients च्या कमतरतेमुळे होऊ शकतो माइग्रेनचा त्रास; आजच काही गोष्टींचा आहारात करा समावेश

Health Tips For Migraine : शरीरात काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे देखील मायग्रेन होऊ शकतो.

दैनिक गोमन्तक

Health Tips For Migraine : डोकेदुखीची समस्या खूप गंभीर असते. डोके दुखत असेल, संपूर्ण शरीर निरोगी असले तरी कोणतेही काम करणे कठीण होते. मायग्रेन हा डोकेदुखीच्या सर्वात धोकादायक प्रकारांपैकी एक आहे. डोक्याच्या एका भागात मायग्रेनचा त्रास होतो.

मायग्रेनची समस्या अनुवांशिक देखील असू शकते. परंतु शरीरात काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे देखील मायग्रेन होऊ शकतो. कोणत्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मायग्रेन होऊ शकतो आणि त्यापासून मुक्त कसे व्हावे ते जाणून घेऊया. (Health Tips For Migraine)

  • मॅग्नेशियमची कमतरता

मॅग्नेशियमची कमतरता डोकेदुखीचे कारण असू शकते. अशावेळी मायग्रेन होऊ शकतो. मायग्रेन बरा करायचा असेल तर शरीरात मॅग्नेशियमचा पुरवठा करणेही आवश्यक आहे. यासाठी मॅग्नेशियम भरपूर असलेल्या गोष्टी खाव्यात.

  • व्हिटॅमिन डीची कमतरता

व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक आहे. हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी शरीराला व्हिटॅमिन डीची गरज असते. मॅग्नेशियमसाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. असे असल्यास, काही वेळ उन्हात बसा आणि व्हिटॅमिन डीची पूर्तता करा किंवा तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.

Migraine
  • व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होऊ शकते. जर शरीरात व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6 आणि व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर तुम्हाला मायग्रेनचा सामना करावा लागू शकतो. मायग्रेनचा त्रास असेल तर या जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टी आहारात खाव्यात.

  • या गोष्टींचा आहारात करा समावेश

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेवर मात करण्यासाठी केळी, सफरचंद, ब्रोकोलीसारख्या भाज्या आणि दूध, दही, चीज, अंडी, कडधान्ये, नट, मासे यासारख्या गोष्टी खाव्यात. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवरही मात करता येते. मॅग्नेशियमची कमतरता हिरव्या भाज्या, शेंगदाणे, गहू, बार्ली आणि ओट्सने पूर्ण केली जाऊ शकते.

Migraine Diet

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT