Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: शरीर- मन निरोगी ठेवायचंय? आजपासून 'या' सवयी लावा, काही दिवसांतच बदल अनुभवाल

Health Tips: आरोग्यदायी जीवनशैलीसाठीचे उपाय

Ganeshprasad Gogate

Health Tips: चांगल्या आणि उत्तम निरोगी आयुष्यासाठी 'निरोगी शरीर' आणि 'निरोगी मन' हवे. यासाठी प्रत्येकाने काही ठराविक गोष्टी केल्यास आपण सर्वजण निरोगी आणि उत्साहपूर्ण आयुष्य व्यतीत करू शकतो. यासाठी आपण स्वतः स्वतःला काहीगोष्टीचं बंधन घालणं आवश्यक आहे.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीर मन स्वस्थ हवे. त्यासाठी काही मानसिक व शारीरिक सवयी अंगिकारणे आवश्यक असतात, जसे की...

  • रोज थोडा तरी वेळ व्यायामासाठी देणे आवश्यक असते. व्यायाम किती करावा असा एक प्रश्न पडतो पण फार आणि कष्ट होतील इतका व्यायाम करू नये.

  • सर्वांगाला व्यायाम होईल असे मोजके व्यायाम करावेत. खाली वाकून हातानी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा व्यायाम केल्यास पाठीचे स्नायू ताणले जातात. त्या स्नायूवर आधीच ताण पडलेला असतो. तेव्हा असा व्यायाम घेणे हिताचे नाही. त्यापेक्षा जॉगिंग करावे.

  • उताणे निजून पाय हळूहळू उंच करणे हा व्यायामप्रकार पोटाच्या दृष्टीने चांगला असतो. मानेच्या स्नायूना ताण देण्याचा व्यायाम घ्यावा. मधूनच फिरण्याचाही व्यायाम चांगला.

  • आठवडाभर बैठेकाम केल्यानंतर साप्ताहिक सुटीच्या दिवशी जास्त कष्टाची कामे केली तरी दुसरे दिवशी कामावर जाताना ताजेतवाने वाटण्याऐवजी माणसाला थकल्या भाकल्यासारखेच वाटते म्हणून सुट्टीच्या दिवशीही पूर्ण वेळ काम न करता थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

  • सुदृढ आरोग्यासाठी भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण माणसाला आठ तास झोप घेतल्याशिवाय भागत नाही. यासंबंधी पाहणी केली असता असे आढळून आले की, दीर्घायुषी लोकांचे भरपूर झोप घेणे हे मुख्य सूत्र होते. शारीरिक श्रम हे थोड्या विश्रांतीनंतर भरून निघतात परंतु मानसिक श्रम करणाऱ्यांना जास्त झोप घेणे आवश्यक व हिताचे असते.

  • जेवण हे सावकाश व मन लावून जेवले पाहिजे. घाईगडबडीत जेवण घेणे गैर आहे - आहाराच्याबाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. जास्त प्रोटीन अन्नात असली तर शरीरप्रकृती अधिक चांगली राहते.

    सकाळी न्याहारी करणे उत्तम. त्यानंतर दुपारचे जेवण बेताचे घ्यावे. रात्रीचे जेवणही पूर्ण घ्यावे. घाईगडबडीत जेवण घेतल्याने अपचन आणि पोटाचे इतर विकार उद्भवतात.

  • सुदृढ आरोग्यासाठी मनाचे आरोग्य जपावे लागते. मानसिक ताण हा रोजच्या रोज घालवायला पाहिजे. मानसिक ताणामुळे शरीर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. शारीरिक व्यथांचे मूळ मानसिक व्यथेत असते, असे काही तज्ज्ञांना आढळून आले आहे.

  • शारीरिक तक्रार असेल तर त्वरित तपासणी करून घेऊन उपाय योजावेत. शरीरप्रकृतीची काळजी करीत बसण्यानेच जास्त त्रास होतो. उगाचच काही गोष्टींबाबत बरेचजण काळजी करत बसतात.

    त्यांच्या नुसत्या काळजी करण्याने ती समस्या सुटणारी नसते तरीही काळजी करण्याचा मनाला छंदच लागलेला असतो. या 'काळजी'चा सर्व्हे घेतला असता नव्वद टक्के चिंता निराधार असतात असे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT