disadvantages wearing tight ring Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हीही बोटांमध्ये घट्ट अंगठी घालतायं? होउ शकतो 'हा' गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

जर तुम्ही खूप दिवसांपासून बोटात घट्ट अंगठी घातली असेल तर आजच ती काढुन ठेवा अन्याथा....

दैनिक गोमन्तक

Disadvantages Wearing Tight Ring: पुरुष असो वा स्त्री जवळपास प्रत्येकाला बोटात अंगठ्या घालायला आवडतात. काही लोक फॅशनेबल किंवा स्टायलिश दिसण्यासाठी अंगठ्या घालतात आणि काही लोक धार्मिक किंवा आध्यात्मिक हेतूने बोटांमध्ये अंगठी घालतात.

अनेक लोक बोटावर एकच अंगठी वर्षानुवर्षे बोटांमध्ये ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. खरं तर बोटांमध्ये खूप घट्ट असलेली अंगठी जास्त वेळ घातल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यापैकी एक म्हणजे एम्बेडेड रिंग सिंड्रोम, चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया याची कारणे काय आहेत.

जर तुम्ही वर्षानुवर्षे एकच अंगठी घालत असाल आणि तुमचे वजन झपाट्याने वाढले असेल तर ही अंगठी तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकते. खरं तर, जर्नल ऑफ हँड सर्जरीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, खूप घट्ट अंगठी घातल्याने दीर्घकालीन आकुंचन होऊ शकते, जी खूप चिंतेची बाब आहे. कारण त्यामुळे 'एम्बेडेड रिंग सिंड्रोम' (Embedded Ring Syndrome) होऊ शकतो जी धोकादायक स्थिती आहे

घट्ट अंगठी घालण्याचे तोटे माहीत असूनही बरेच लोक घट्ट अंगठी घालतात. पण जर तुम्हाला घट्ट अंगठी घातल्यामुळे संसर्ग झाला तर त्याची शक्यता आणखी वाढेल. नंतर हा संसर्ग बोटांसह संपूर्ण हातामध्ये पसरु शकतो. अशा त्रस्त लोकांवर उपचार करणे खूप कठीण होऊन जाते आणि शेवटी डॉक्टरांना हात कापावा लागतो.

  • या समस्या वाढु लागतात  

इतकेच नाही तर बोटाला सूज येताना अंगठी नसा संकुचित करते. बोटांच्या ऊतींवर वाईट परिणाम होउ लागतो. म्हणूनच घट्ट अंगठी घालु नका. कारण बोटांपासून सुरू होणारा संसर्ग संपूर्ण हात आणि अगदी हाडांपर्यंत पोहोचू शकतो. 

ज्याचा परिणाम अतिशय घातक आहे. जर तुमच्या बोटात अंगठी अडकली असेल किंवा अंगठी घट्ट असेल तर कोणताही विचार न करता लगेच बोटातून काढून टाका.

(डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT