Health Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Care Tips: रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी आहारात 'हे' पदार्थ हवेच

जर तुमच्या शरिरातील रक्ताभिसारण सुरळित होत नसेल तर आहारकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Health Care Tips: निरोगी शरिरासाठी पोषक आहार घेणे गरजेचा आहे. तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात समस्या निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे शरिरातील रक्ताभिसरण सुरळित राहणे गरजेचे आहे. जर रक्ताभिसरण सुरळित होत नसेल तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरातील रक्ताभिसरणात अडथळे निर्माण झाल्यामुळे सन्नपणा येणे, सूज येणे अशी लक्षणे बाहेरून दिसतात, तर या समस्येमुळे ब्लड प्रेशर, वजन वाढणे, मधुमेह यांसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या आहाराकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे.

  • टोमॅटो

टोमॅटो अनेक पदार्थांची चव वाढवते. टोमॅटो खाणे हृदयासाठी चांगले मानले जाते. त्याचवेळी यामध्ये असलेले व्हिटॅमिन के रक्तभिसारण सुरळित ठेवण्यास मदत करते. आहारात टोमॅटोचा समावेश करावा.

  • ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. रोजच्या आहारात बदाम आणि अक्रोडचा समावेश करावा. यामध्ये असलेले ऑक्सिडेटिव्ह तुमचा ताण कमी करण्यास मदत करतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.

  • हिरव्या पालेभाज्या

रक्ताभिसारणाच्या समस्या कमी करण्यासाठी बीट आणि लसूण खाणे फायदेशीर ठरते. नियमित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे रक्ताभिसरण सुरळित कार्य करते.

  • व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ

ज्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी असते त्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जसे की मोसंबी, संत्र,यासारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. या फळांचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुरळित कार्य करते.

  • या गोष्टींची घ्यावी काळजी

रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी योग्य आणि निरोगी लाइफस्टाइल असणे गरजेचे आहे. यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश करावा. तसेच नियमितपणे योगा करावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळित कार्य करण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT