Knee Pain Remedy at Home  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Knee Pain Remedy : गुडघेदुखीने आहात हैराण? करा 'या' घरगुती गोष्टींचा वापर

Knee Pain Remedy at Home : बदलत्या ऋतूमध्ये आणि थंडीच्या काळात गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते.

दैनिक गोमन्तक

Knee Pain Remedy at Home : गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात. विशेषत: बदलत्या ऋतूमध्ये आणि थंडीच्या काळात गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला सामान्य कारणांमुळे गुडघेदुखी होत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करून गुडघेदुखीवर उपचार करू शकता. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे गुडघेदुखीपासून लवकरात लवकर आराम मिळू शकतो. चला जाणून घेऊया या घरगुती उपायांबद्दल.

(Knee Pain Remedy at Home)

मेथी दाणे

गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी मेथीचे दाणे गुणकारी ठरू शकतात. यासाठी अर्धा चमचा मेथी पावडर घ्या. सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत घ्या. याशिवाय भिजवलेले मेथी दाणे खा. यामुळे दुखण्यापासून खूप आराम मिळेल.

हळदीचे दूध

गुडघे आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी हळदीचे दूध प्या. यासाठी 1 ग्लास कोमट दूध घ्या. त्यात 1 चिमूट हळद मिसळा. त्यानंतर झोपण्यापूर्वी ते प्या. याच्या मदतीने गुडघेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

आले

गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा वापर करा. हिवाळ्यात गुडघेदुखी कमी करण्यासाठी आल्याचा चहा, आल्याचे लोणचे, आल्याचे पाणी पिऊ शकता. याशिवाय आले बारीक करून गुडघ्यांवर लावा. यामुळे वेदना कमी होऊ शकतात.

कोरफड

गुडघेदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचे जेल वापरा. त्यामुळे गुडघ्यांची सूज कमी होईल. ते वापरण्यासाठी, कोरफड जेलमध्ये थोडी हळद पावडर मिसळा. यानंतर, वेदनाग्रस्त भागावर लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

SCROLL FOR NEXT