Jaggery Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jaggery Tea: साखरेएवजी प्या गुळाचा चहा, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

तुम्हीही साखरेचा चहा पित असाल तर आजच बंद करा. कारण चहा एवजी रोज गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Puja Bonkile

Jaggery Tea: अनेक लोक दिवसाची सुरूवात चहाने करतात.पण तुम्ही कधी विचार केला आहे का साखरेऐवजी गुळाचा चहा पिला तर काय होईल? साखरेच्या तुलनेत गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. गुळाचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते,पचनसंस्था सुरळित कार्य करते,रोगप्रतिकारशक्ती सुधारते.गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.

अशक्तपणा कमी होतो
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. कारण गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि जस्त यांसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे अशक्तपणात उद्भवणाऱ्या रक्तघटकांची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. गूळ रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. याशिवाय गुळाचा चहा येणारा अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. गुळामध्ये खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह यासारखे अनेक पोषक घटक असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर नियमितपणे साखरेऐवजी गुळाचा चहा प्यावा.

पचनसंस्था सुरळित कार्य करते
गुळाचा चहा पचनक्रिया मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. गुळाचा चहा नियमित प्यायल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. गुळात आढळणारे फ्रक्टोज आणि फायबर सहज पचतात आणि पोट हलके राहते. त्यामुळे अॅसिडिटी कमी करून पोटाची जळजळ आणि अल्सरसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. गुळात आढळणारे प्रोबायोटिक गुणधर्म आतड्यांमध्ये निरोगी जीवाणूंच्या विकासास प्रोत्साहन देतात. गुळाचा चहा हा पचनसंस्था मजबूत करण्यासाठी एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. 

वजन नियंत्रणात राहते

साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. गुळामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह यासारखे घटक चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. गुळाच्या चहाचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते. ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. हे पचनसंस्था देखील निरोगी ठेवते जे वजन नियंत्रणासाठी खूप महत्वाचे आहे. गुळातील फायबर पोट भरून भूक कमी करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT